मी तर संघातच नाही...! वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेविरुद्ध प्रश्न विचारताच शुभमन गिल झाला व्यक्त

Shubman Gill Reaction on T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेबाबत शुभमन गिलला प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने दिलेलं उत्तर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताने 2-1 विजय मिळवला असून आता टी20 मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ टी20 मालिकेत उतरणार आहे. दुसरीकडे, वनडे मालिका संपल्याने आणि कसोटी मालिका अजून लांब असल्याने शुभमन गिल आराम करत आहे. कारण शुभमन गिल हा टी20 संघाचा भाग नाही. पण शुभमन गिल पाहिल्यानंतर अनेकांना तो टी20 संघाचा कर्णधार असल्याचा भास होतो. त्यामुळे त्याला या फॉर्मेटबद्दल प्रश्न विचारला जातो. असाच प्रश्न वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी शुभमन गिलला विचारला गेला. त्यावर त्याने आपल्या शैलीत उत्तर दिलं.टीम इंडियाचा वनडे आणि कसोटी कर्णधार शुभमन गिलने दिलेलं उत्तर आता व्हायरल होत आहे. शुभमन गिलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेबाबत प्रश्न विचारला गेला होता.



काय म्हणला शुभमन गिल?


एशियन गेम्स 2026 स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृ्त्वात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं. या कामगिरीसाठी शुभमन गिलने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. माझ्याकडून सर्व संघाचं अभिनंदन, असं तो म्हणाला. त्याने शुभेच्छा दिल्यानंतर त्याच्या पुढ्यात दुसरा प्रश्न तो म्हणजे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी काय प्लानिंग केली आहे? तेव्हा शुभमन गिल म्हणाला की, मी तर टी20 संघाचा भागच नाही. शुभमन गिलने शेवटचा टी20 सामना मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात खेळला होता. म्हणजेच एक वर्षापासून टीम इंडियाच्या टी20 संघाचा भाग नाही. इतकंच काय टी20 वर्ल्डकप स्पर्धेतूनही त्याला डावलण्यात आलं होतं. शुभमन गिलने भारतासाठी 36 टी20 सामने खेळले असून त्यात त्याने 138.59 च्या स्ट्राईक रेटने 869 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.


http://prahaar.in/2026/10/06/harmanpreet-kaurs-major-decision-steps-down-as-team-india-captain/

शुभमन गिल टी20 संघात नसण्याचं कारण की..


शुभमन गिल टी20 संघाचा भाग नाही. कारण भारतीय संघात टी20 संघात बरेच पर्याय आहे.ओपनिंगसाठी अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशीसारखे दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे शुभमन गिलसाठी टॉप ऑर्डरमध्ये खेळण्यासाठी जागा नाही. खरं तर शुभमन गिलचा स्ट्राईक रेट तितका चांगला नाही. त्या तुलनेत इतर फलंदाजांचा स्ट्राईक रेट त्याच्यापेक्षा चांगला असल्याने त्याला संघात जागा मिळाली नाही. शुभमन गिलकडे वनडे आणि कसोटी संघाची धुरा आहे.

Comments
Add Comment

Harmanpreet Kaur: कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौरची जागा कोण घेणार? हे नाव आघाडीवर

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने देदिप्यमान यश मिळवलं आहे. तिच्या नेतृत्वात भारतीय संघाने वनडे

Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय; टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा घेतला निरोप

Harmanpreet Kaur steps down as captain :  भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि माजी विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरने

असं कसं झालं! गोलंदाजाने टाकलेला बॉल एक टप्पा घेत थेट षटकार, पण मिळाल्या 5 धावा Video पाहा

क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये विक्रम रचणं आणि मोडणं, हे काय नवीन राहिलेलं नाही. आजवर अनेक विक्रम रचले गेले आणि

रोहित शर्माने तिसऱ्या वनडे सामन्यात 92 धावा केल्यानंतरही सुनील गावस्कर नाखुश; असं कारण देत म्हणाले...

भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. रोहित शर्माने आपल्या खेळीने

IND vs WI T20: प्लेइंग 11 मध्ये वैभव सूर्यवंशी असेल की नाही? गौतम गंभीरने एका वाक्यात विषय संपवला

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जेतेपद पटकावलं आणि सुवर्ण पदकावर नाव कोरलं. भारताने

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी भारताचा अर्धा संघ निश्चित! आकाश चोप्राने 6 नाव केली जाहीर

आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. आयसीसीने या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं असून दोन गटातील