झेल पकडताना नेमकं काय घडलं?
मिचेल ओवेने मारलेला चेंडू वर चढल्याचं पाहून विकेटकीपर प्रभसिमरन सिंह आणि निशांत सिंधु यांनी धाव घेतली. प्रभसिमनरन सिंह स्टम्पच्या मागून पॉइंटच्या दिशेने वेगाने धावत गेला. तर निशांत सिंधु तिथेच फिल्डिंग करत असल्याने झेल पकडण्यासाठी तयार होता. पण या दरम्यान दोन्ही खेळाडू एकमेकांना कॉल देण्यास विसरले. दोन्ही खेळाडू चेंडूच्या बरोबर खाली आल्यानंतर त्यांची जोरदार धडक झाली. प्रभसिमरनने हा झेल पकडला, पण दोन्ही खेळाडू दुखापतग्रस्त होण्यापासून थोडक्यात बचावले. खरं तर त्याचं सुदैव म्हणून फार काही झालं नाही. पण यावेळी निशांत सिंधु मात्र नाराज दिसला. कारण हा झेल त्याच्या हातातला असूनही प्रभसिमरन धावत आल्याने त्याला काही कळलंच नाही. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Yash Thakur gets the big fish! 🎣
Mitchell Owen departs as India A get their first wicket.🔥
#INDAvAUSA 👉 Streaming Live Now https://t.co/zk2ABY21JG https://t.co/ptGL7Ho9M1
— Star Sports (@StarSportsIndia) October 6, 2026
आयपीएल 2027 स्पर्धेसाठी आता अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. इतकंच काय तर रिटेन केलेल्या खेळाडू यादी जाहीर करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2026 ही शेवटची ...
प्रभसिमरन सिंहने हा झेल पकडल्यानंतर भारताच्या खात्यात पहिली विकेट आली. ऑस्ट्रेलिया अ संघाच्या 23 धावा असताना पहिली विकेट पडली. मिचेल ओवेन 7 चेंडूत 10 धावा करून बाद झाला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत अ (प्लेइंग इलेव्हन): साई सुधारसन, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड (कर्णधार), रजत पाटीदार, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, अनुकुल रॉय, अर्शद खान, यश ठाकूर.
ऑस्ट्रेलिया 'अ' संघ (प्लेइंग इलेव्हन): सॅम कॉन्स्टास, मिचेल ओवेन, जोश फिलिप (विकेटकीपर), नॅथन मॅकस्वीनी, लियाम स्कॉट, निखिल चौधरी, विल सदरलँड (कर्णधार), टॉड मर्फी, स्पेन्सर जॉन्सन, रायली मेरेडिथ, माहली बियर्डमन.