Tuesday, October 6, 2026

श्रेयस अय्यरचा महाविक्रम! विंडीजविरुद्ध ऐतिहासिक शतक ठोकत मोडले रोहित अन् विराटचे रेकॉर्ड्स

भारताने पहिल्या टी20 सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजला 8 गडी राखून नमवलं. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने ठोकलेलं शतक लक्षवेधी ठरलं.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर झंझावात पाहायला मिळाला.  वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना त्याने शतकी खेली. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना शतक झळकावणारा श्रेयस अय्यर हा भारताचा पहिला आणि एकमेव कर्णधार ठरला आहे. यापूर्वी भारतीय कर्णधारातर्फे धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावसंख्या विराट कोहलीच्या नावावर होती. त्याने 2019 मध्ये हैदराबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्धच नाबाद 94 धावा केल्या होत्या. आता विक्रम श्रेयस अय्यरच्या नावावर नोंदवला गेला आहे.  इतकंच काय तर या सामन्यात इशान किशनसोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 137 धावांची खेळी केली. टी20 क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना भारताची ही तिसरी सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 2023 मध्ये यशस्वी जयस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी 165 धावांची भागीदारी, तर झिम्बाब्वेविरुद्ध 2024 मध्ये यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलने 156 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर आता श्रेयस अय्यर आणि इशान किशन या जोडीचं नाव येतं.

श्रेयस अय्यरचं विक्रमी शतक

वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय T20 मध्ये शतक झळकावणारा श्रेयस अय्यर हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे लखनौच्या मैदानावर विंडीजविरुद्ध शतक ठोकणारा दुसरा भारतीय आहे. यापूर्वी रोहित शर्माने लखनौमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 111 धावा, केएल राहुलने लॉडरहिलमध्ये 2016 मध्ये नाबाद 110 आणि आता श्रेयस अय्यरने लखनौमध्ये नाबाद 102 धावांची खेळी केली आहे.

धावांचा पाठलाग करताना  शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या क्लबमध्ये श्रेयस अय्यर

  • 117 धावा – सूर्यकुमार यादव वि. इंग्लंड (ट्रेंट ब्रिज, 2022)
  • 110 धावा* – केएल राहुल वि. वेस्ट इंडिज (लॉडरहिल, 2016)
  • 102 धावा* – श्रेयस अय्यर वि. वेस्ट इंडिज (लखनौ, 2026)
  • 101 धावा* – केएल राहुल वि. इंग्लंड (ओल्ड ट्रॅफर्ड, 2018)
  • 100 धावा* – रोहित शर्मा वि. इंग्लंड (ब्रिस्टल, 2018)

कर्णधार म्हणून वेगवान शतक ठोकणाऱ्या जगातील टॉप-5 फलंदाजांमध्ये श्रेयस

  • 33 चेंडू – सिकंदर रझा (झिम्बाब्वे) वि. गॅम्बिया, 2024
  • 35 चेंडू – रोहित शर्मा (भारत) वि. श्रीलंका, 2017
  • 42 चेंडू – हॅरी ब्रूक (इंग्लंड) वि. श्रीलंका, 2026
  • 42 चेंडू – श्रेयस अय्यर (भारत) वि. वेस्ट इंडिज, 2026
  • 46 चेंडू – फाफ डु प्लेसिस (दक्षिण आफ्रिका) वि. वेस्ट इंडिज, 2015

कर्णधार म्हणून T20 शतक ठोकणारे भारतीय खेळाडू

  • 121 धावा* – रोहित शर्मा वि. अफगाणिस्तान, 2024
  • 118 धावा – रोहित शर्मा वि. श्रीलंका, 2017
  • 111 धावा* – रोहित शर्मा वि. वेस्ट इंडिज, 2018
  • 102 धावा* – श्रेयस अय्यर वि. वेस्ट इंडिज, 2026
  • 100 धावा – सूर्यकुमार यादव वि. दक्षिण आफ्रिका, 2023

लखनौच्या 'एकाना' मैदान श्रेयससाठी लकी

  •  57*(28) वि. श्रीलंका (2022)
  • 23(15) वि. लखनऊ सुपर जायंट्स (2024)
  • 52*(30) वि. लखनऊ सुपर जायंट्स (2025)
  • 101*(51) वि. लखनऊ सुपर जायंट्स (2026)
  • 102*(43) वि. वेस्ट इंडिज (2026)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा