ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर क्रीडाविश्वातून श्रद्धांजली, सचिन-विराट यांनी व्यक्त केला शोक
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरूवारी सकाळी निधन झालं. त्यांच्या निधनाच्या बातमीने राजकीय, कला आणि क्रीडाक्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.
October 8, 2026 01:29 PM
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना क्रीडाविश्वातून श्रद्धांजली, सचिन-विराट यांनी व्यक्त केला शोक (Photo: ANI)
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने गुरूवारी पहाटे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. त्यामुळे डॉक्टरांना त्यांना मृत घोषित केलं. त्यांचं असं अकाली जाणं राजकीय, कला आणि क्रीडा विश्वाला धक्का देणारं होतं. नाना पाटेकर हे हरहुन्नरी कलाकार होते आणि समाजकारणात कायम आघाडीवर असायचे. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयगी कामं केली. त्यामुळे अभिनयासोबत त्याच्या सामाजिक कामाची दखल घेतली गेली. नाना पाटेकर यांच्या निधनातर सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. क्रीडाविश्वातूनही नाना पाटेकर यांच्या निधनानंतर शोकाकुल प्रतिक्रिया उमटल्या आहेत. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने नाना पाटेकर यांना श्रद्धांजजली वाहताना आठवणींना उजाळा दिला. सचिनने लिहिलं की, नाना हे स्पष्ट वक्ते होते आणि जमिनीवर काम करणारे व्यक्त होते. आपलं काम ते प्रामाणिकपणे करायचे. मग ते मराठीत असो की हिंदीत. ते जो अभिनय करायचे त्यात जीव ओतायचे. त्यामुळे ते व्यक्तिमत्व खरं वाटायचं. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून खुप दु:ख झालं. त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना प्रती माझ्या संवेदना. ओम शांती.
I remember Nana Patekar as a very straightforward and grounded person. His work had that same honesty to it. Whether it was in Marathi or Hindi, he always brought something very real to the characters he played.
Very sad to hear about his passing.
My condolences to his family and loved ones. Om Shanti.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 8, 2026
रनमिशन विराट कोहली यांनीही नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय चित्रपटसृष्टीतील महान व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला. विराट कोहलीने पोस्ट करत लिहिलं की, नानांचे कार्य आणि त्यांनी मागे ठेवलेला वारसा पिढ्यानपिढ्या स्मरणात राहील. नाना पाटेकरजी. ओम शांती.
A true legend of Indian cinema. His work and legacy will live on for generations. Rest in peace, Nana Patekar ji. Om Shanti. 🙏
Nana Patekar Funeral Updates : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि प्रभावी ...
नाना पाटेकर यांचं क्रिकेटप्रेम कधी लपलं नाही? क्रिकेट सोडावं लागल्याचं त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं होतं. नाना पाटेकर यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, माझ्या बोटाला दुखापत झाली आणि त्यामुळे मला क्रिकेट सोडावंलागलं.पण हे एक कारण नव्हतं. मला काम करून आई वडिलांना आधार द्यावा लागत होता. त्यामुळेच क्रिकेट सोडलं. दरम्यान, नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार होणार आहे. शासकीय इतमामात त्यांच्या अंत्यसंस्कार केले जाणार आहे.