Friday, October 9, 2026

विंडीजला 76 धावांचा फटका, पूरनची चूक पडली महागात! संजू सॅमसनने केलं संधीचं सोनं

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी20 सामना सुरू आहे. या सामन्यात विंडीजला धावांचा फटका बसला आहे. त्याला कारणंही तसंच आहे. नेमकं काय घडलं आणि इतक्या धावांचा भुर्दंड बसण्याचं कारण काय ते समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी20 सामना रांचीत सुरू आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी मैदानात उतरली. या जोडीकडून आक्रमक खेळीची अपेक्षा होती. पण मैदान थोडं ओलं असल्याने चेंडू बॅटवर येताना अडचण येत होती. त्यात वेस्ट इंडिजने पहिलं षटकापासून फिरकीला प्राधान्य दिलं. पहिलं षटक अकील होसेनच्या हाती सोपवलं त्यामुळे दोन्ही फलंदाजांना आक्रमक फटकेबाजी करण्यात अडचण आली. त्यात अभिषेक शर्माने फटकेबाजी केली. पण संजू सॅमसनने थोडा वेळ घेतला. संजू सॅमसनने 4 चेंडूत 6 धावा केल्या होत्या. सामन्यातील पाचवा चेंडू खेळताना संजू सॅमसनने चॅन्स घेण्याचा प्रयत्न केला आणि पॉइंटच्या दिशेने जोरात फटका मारला. खरं तर हा चेंडू थेट पूरनच्या हातात होता. मात्र हा झेल पकडताना चाचपडला आणि झेल सोडला. त्यामुळे संजू सॅमसनला अवघ्या 6 धावा असताना जीवदान मिळालं. या सधीचं त्याने सोनं केलं आणि नंतर जोरदार फटकेबाजी केली. संजू सॅमसन 82 धावांची खेळी करून बाद झाला, पण विंडिजला 76 धावांचा फटका बसला.

संजू सॅमसनची आक्रमक खेळी

संजू सॅमसनने 21 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 247.62 चा होता. संजू सॅमसनने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 21 चेंडू घेतले. वेस्ट इंडिजविरुद्ध भारतासाठी संयुक्तपणे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. 2019 मध्ये वानखेडेवर विराट कोहलीनेही तितक्याच चेंडूंचा हाच विक्रम घेतला होता. संजू सॅमसनने 41 चेंडूत 82 धावांची खेळी केली आणि बाद झाला. त्याच्या या खेळीमुळे वेस्ट इंडिजला 76 धावांचा फटका बसला, असं म्हणायला हरकत नाही. कारण 6 धावांवर असताना सोपा झेल सोडला होता. भारताने पॉवरप्लेच्या सहा षटकात 1 गडी गमवून 87 धावा केल्या. यासह टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पॉवरप्लेमधील ही भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी भारताने 2019 मध्ये वानखेडेवर केलेल्या 70 च्या धावसंख्येला मागे टाकले आहे.
भारताने 2026 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 311हून अधिक षटकार मारले आहेत. 2022 मध्ये 289 षटकार मारले होते. इतर कोणत्याही पूर्ण-सदस्य संघाने एका कॅलेंडर वर्षात 250 पेक्षा जास्त षटकार मारलेले नाहीत. 2026 मधील त्यांचे चेंडू/षटकार गुणोत्तर 10.94 इतकं आहे. किमान 15 सामन्यांच्या निकषानुसार एका कॅलेंडर वर्षातील कोणत्याही पूर्ण-सदस्य संघासाठी सर्वोत्तम आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >