
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना पार पडला आणि ऑस्ट्रेलियाने सीरिज खिशात घातली. दुसऱ्या सामन्यानंतर मालिकेत 2-0 अशी स्थिती आहे. त्यामुळे तिसरा सामना हा औपचारिक असणार आहे. उलट भारताला वनडे मालिकेत क्लिन स्वीप मिळण्याची भीती आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 125 धावांनी पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात भारताला 69 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 275 धावा केल्या आणि विजयासाठी 276 धावा दिल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 206 धावांवर बाद झाला. खरं तर या मालिकेत भारतीय फलंदाजी सपशेल फेल गेली. रजत पाटिदार वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही.
काय म्हणाला ऋतुराज गायकवाड?
ऋतुराज गायकवाड म्हणाला की, 'आम्हाला हवी तशी सुरुवात झाली नाही, पण साहजिकच जेव्हा पॉवरप्लेमध्ये तीन विकेट पडतात, तेव्हा तुम्ही आधीच बॅकफूटवर असता. त्यामुळे मला वाटतं की पुन्हा एकदा आम्ही विकेट गमावल्या आणि त्यानंतर आम्ही फक्त पिछाडी भरून काढत होतो. हो, मला वाटतं याचं बरंच श्रेय त्यांना द्यायला हवं. त्यांनी परिस्थितीशी खूप चांगल्या प्रकारे जुळवून घेतलं आहे. तुम्हाला माहिती आहे, एक फलंदाज स्थिरावलेला दिसतोय, त्यांच्यापैकी एक जण बराच वेळ फलंदाजी करत आहे, मागच्या सामन्यात स्वीनी, अगदी कॉन्स्टासनेही आज चांगली फलंदाजी केली. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी फलंदाजीत खूप चांगल्या प्रकारे जुळवून घेतलं आहे आणि गोलंदाजीतही मला वाटतं की त्यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे आणि ते सातत्यपूर्ण राहिले आहेत. मला वाटतं की काही वेळा आम्ही दुर्दैवी ठरलो आणि बऱ्याच संधी इकडे तिकडे गेल्या, पण मला वाटतं की इथे फिरकी गोलंदाजी खेळणं थोडं सोपं आहे. तुम्ही स्ट्राईक चांगल्या प्रकारे फिरवू शकता, पण मध्यमगती गोलंदाजी थोडी जास्तच संथ आणि जास्तच वेगवान येत आहे. पण दुर्दैवाने आजचा दिवस आमचा नव्हता.'
वैभव सूर्यवंशी भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव.. कमी वयात आणि अल्पावधीतच त्याने नावलौकीक मिळवला. आयपीएल स्पर्धा ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या ...
सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर स्पेन्सर म्हणाला की, परिस्थिती आमच्यासाठी अनुकूल होती. ऋतुराज चांगली फलंदाजी करत होता. मी घेतलेला सर्वोत्तम झेल होता. त्याने चांगली सुरुवात केली आणि आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता. सर्वांनी चांगली गोलंदाजी केली. प्रत्येकाने आपापली भूमिका बजावली. कर्णधाराने गोलंदाजांना आलटून पालटून संधी दिली. मी आतापर्यंत खेळलेल्या खेळांमधील ही सर्वात उष्ण परिस्थिती होती.
पहिल्या वनडे मालिकेत रजत पाटिदारने 51 चेंडूत 53 धावा केल्या होत्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज 35 धावांचा पुढचा पल्ला गाठू शकलं नाही. दुसऱ्या वनडे सामन्यातही रजत पाटिदारने 67 धावांची खेळी केली. तर अनुकूल रॉयने 34 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाजी तग धरू शकला नाही. त्यामुळे दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजी पूर्णपणे निष्फळ ठरली.





