IND vs NZ: भारत न्यूझीलंड टी20 मालिकेसाठी संघात अचानक बदल, हे दोन खेळाडू दुखापतीमुळे आऊट

IND vs NZ T20I Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ जाहीर करण्यात आले आहे. पण आता दोन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने संघात बदल करावा लागला आहे.

भारत न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यासाठी न्यूझीलंड आणि भारतीय संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची टी20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ लगेचच न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे या मालिकेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. कारण तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी भारतीय संघाला फार कमी वेळ मिळणार आहे. दुसरीकडे, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच न्यूझीलंड संघाला दोन धक्के बसले आहेत. दुखापतीमुळे दोन दिग्गज खेळाडू या स्पर्धेला मुकणार आहेत. न्यूझीलंडचा मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज मार्क चॅपमॅन आणि वेगवान गोलंदाज जॅक फाउल्क्स जखमी झाला आहे. त्यामुळे संपूर्ण टी20 मालिकेला मुकले आहेत. मागच्या महिन्यात युरोपियन टी20 लीग स्पर्धेत चॅपमॅनच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. त्यामुळे टी20 मालिकेतून आऊट झाला आहे. पण भारताविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी फिट होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जॅक फाउल्क्स कँटरबरी पुरूष संघाच्या सराव शिबिरात दुखापतग्रस्त झाला. त्याच्या उजव्या हिप फ्लेक्सरमध्ये दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून जॅक अजूनही सावरलेला नाी. त्याच्या दुखापतीवर वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे. न्यूझीलंडच्या या दोन खेळाडूंच्या बदली खेळाडूंची घोषणाही करण्यात आली आहे. अष्टपैलू जोश क्लार्कसन आणि वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकनर यांनी दुखापतग्रस्त खेळाडूंची जागा घेतली आहे. आता या दोन्ही खेळाडूंना मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची संधी आहे.





न्यूझीलंडचा अपडेट टी20 संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), फिन एलन, मायकल ब्रेसवेल, जोश क्लार्कसन, डेवोन कॉनवे, जॅकब डफी, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेनरी, बेवोन जॅकब्स, काइल जॅमीसन, एडम मिल्ने, डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टिम सीफर्ट, नाथन स्मिथ, ब्लेयर टिकनर.

भारताचा टी20 संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सैमसन (विकेटकीपर), वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिंस यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव.
Comments
Add Comment

Hong Kong Sixes: 30 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, पीसीबीकडून संघाची घोषणा

हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेला 31 ऑक्टोबरपासून सुरुवात होणआर आहे. ही स्पर्धा तीन

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर क्रीडाविश्वातून श्रद्धांजली, सचिन-विराट यांनी व्यक्त केला शोक

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने गुरूवारी

Thank You...! भारतीय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपला, बीसीसीआयने केलं जाहीर

भारतीय पुरूष क्रिकेट संघाचे निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ अखेर संपुष्टात आला आहे. अजित आगरकर

भुवनेश्वर कुमारचं भारतीय संघात पुनरागमन, पण आरसीबीला बसणार फटका; लिलावाचं गणित असं बिघडणार!

भारतीय संघ 22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंड दौऱ्यात टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने 6

ICC Ranking: वनडेत विराट कोहली फटका आणि शुभमन गिलला झाला फायदा, कसं काय ते समजून घ्या

आयसीसीकडून दर बुधवारी आठवड्याच्या कामगिरीचा आढावा घेऊन क्रमवारी जाहीर करण्यात येते. नुकतीच आयसीसीने वनडे

स्मृती आणि हरमनप्रीत कौर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममध्ये कसं होतं वातावरण? अफवांवर मंधानाने मौन सोडलं

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्वाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. एशियन गेम्स 2026 स्पर्धेत सुवर्ण