Monday, October 12, 2026

Sunny Deol अंत से आरंभ तक...' सनी देओलच्या ॲक्शन चित्रपटाची घोषणा, 'सुर्या'मधील लूकने वेधलं लक्ष

आता बॉलीवूड अभिनेता सनी देओल पुन्हा एकदा आपल्या नव्या भूमिकेमुळे चर्चेत आले

मुंबई : सनी देओल यांनी आजपर्यंत घायल, दामिनी, बॉर्डर, गदर: एक प्रेम कथा, गदर 2, बॉर्डर 2 यांसारखे सुपरहिट चित्रपट केले. याचित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांचे मन जिंकले असून ‘बेताब’ ते ‘गदर 2’ आणि ‘बॉर्डर 2’ हा प्रवास, त्यांचा दमदार संवादफेक करण्याचा अंदाज आणि देशभक्तीपर चित्रपटांमधील योगदान यामुळे त्यांनी लोकांच्या मनात घर केली.(SUNNY DEOL)

आता बॉलीवूड अभिनेता सनी देओल पुन्हा एकदा आपल्या नव्या भूमिकेमुळे चर्चेत आले असून त्यांच्या आगामी ‘सूर्या: अंत से आरंभ तक’ या चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित झाला आहे. या पोस्टरमध्ये सनी देओल गंभीर आणि वेगळ्या रूपात दिसत असून, त्यांच्या या लूकने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. हा चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 ला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन एम. पद्मकुमार यांनी केले आहे. निर्मिती MM Moviez या बॅनरखाली निर्मिती करण्यात आली. चित्रपटात सनी देओल यांच्यासोबत रवी किशन, प्रज्ञा जैस्वाल आणि जिशू सेनगुप्ता हे कलाकारही नवीन भूमिकेत झळकणार आहेसल्याचे कळाले आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टर सोबत मिळालेल्या माहितीनुसार ही कथा भूतकाळ व वर्तमानतील संघर्ष यात अडकलेल्या व्यक्तिभोवती फिरताना दिसत आहे.या चित्रपटाची कथा रहस्यमय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारलेली असून सनी देओल यांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली दिसून येते.(BOLLYWOOD CINEMA)

या मोशन पोस्टर ची माहिती सनी देओल यांनी स्वतः सोशिअल मीडियाच्या माध्यमातून दिली असून चाहता वर्ग या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे समजले आहे. प्रेक्षकांकडून मोशन पोस्टर ला भरभरून प्रतिसाद मिळाले असून हा चित्रपट लवकरच जवळचा चित्रपट गृहात म्हणजेच 20 नोव्हेंबर 2026 ला प्रदर्शित होणार प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. चित्रपट निर्माते यांनी आपले मत व्यक्त केले आहे , "मी सनी देओला 'गदर २' आणि 'सूर्या' या दोन चित्रपटांसाठी निवड केली होती. आम्ही 'गदर २' केला आणि तो चाहत्यांमुळे इतिहास बनला. त्यामुळे सनी देओल यांचे चाहत्यांचा मनात वेगळे स्थान निर्माण झाले. त्याच्या यशाने प्रेरित झालो आणि चित्रपटसृष्टीतील माझ्या पाच दशकांहून अधिक अनुभवाच्या आधारे, मी 'सूर्या' बनवला. या चित्रपटात एका सामान्य माणसाची कथा दिली असून नक्कीच प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारी आहे. सनीदेओ यांना प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही न पाहिलेल्या रूपात पाहता येणार आहे. विशेष म्हणजे, ही कथा त्याच्या आयुष्यातील तीन वेगवेगळ्या टप्प्यांभोवती विणलेली असून हा थ्रिलर प्रेक्षकांना दोन वेगवेगळ्या विश्वांमध्ये घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे."(MOTION POSTER)

 
View this post on Instagram
 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >