
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
पूर्व उपनगरातील सांताकुडा चेंबूर लिंक रोड आणि स्वामीनारायण उड्डाणपुलाच्या बांधकामाचा खर्च तब्बल १६ कोटींनी वाढला आहे. या पुलाच्या अंदाजपत्रके तयार केल्यापासून दोन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर पुलाच्या विविध घटकांमधील बिघाडांचे स्वरूप आणि प्रमाण हळूहळू वाढत गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या वाढलेल्या बिघाडांमुळे आवश्यक दुरुस्ती व पुनर्वसन कामांचे प्रमाण वाढल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
या पुलांच्या बांधकामाचा मूळ कंत्राट किंमत विविध करांसह ३१.७६ कोटी रुपये एवढी होती आणि. यामध्ये पूर्व द्रुतगती मार्गावरील स्वामीनारायण उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामे या कंत्राटदाराने पूर्ण केली आहे. कंत्राटदाराद्वारे पूर्ण करण्यात आलेली आहेत. मे २०२३ दरम्यान ०३ उड्डाणपूलांचे तपासणी अहवाल आणि अंदाजपत्रके तयार करून पूल विभागाच्यावतीने या उड़्डाणपूलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती. परंतु जुलै २०२५ रोजी आयआटीचे प्राध्यापक सौविक बॅनजी यांनी एससीएलआरवरील उड्डाणपूलाच्या स्ट्रक्चरलची फेर तपासणी केली असता दोन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर पुलाच्या विविध घटकांमधील संरचनात्मक बिघाडांचे स्वरूप आणि प्रमाण हळूहळू वाढत गेल्याचे जुलै २०२५ मध्ये केलेल्या संरचनात्मक तपासणी अंती आढळून आले आहे. या वाढलेल्या बिघाडांमुळे आवश्यक दुरुस्ती व पुनर्वसन कामांच्या व्याप्ती आणि प्रमाणात वाढ झालेली आहे.
पुणे : अपुऱ्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी पुणे महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 15 ऑक्टोबरपासून दर ...
त्यामुळे पुलाचे आयुष्यमान वाढवण्यासाठी संरचनात्मक दुरुस्तीचे उपाय सुचविले आहेत. त्याबाबतची पडताळणी आय. आय. टी. बॉम्बे यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे. या वाढीव कामामुळे मूळ कंत्राट किमतीमधे बदल झाला आहे. हा खर्च विविध करांसह १६ कोटी रुपयांनी वाढला असून ३१.७६ कोटी रुपयांचे काम १६.२६ कोटी रुपयांनी वाढून आता ४८.०३ कोटींवर जावून पोहोचले आहे.






