Saturday, October 24, 2026

"आरोप- प्रत्यारोप नको, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला जा"; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे शिवसेनेच्या सर्व आमदार- मंत्र्यांना आदेश

एकमेकांवर सुरू असलेले आरोप- प्रत्यारोप थांबवा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला जा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत.

मुंबई: एकमेकांवर सुरू असलेले आरोप- प्रत्यारोप थांबवा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला जा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपनंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. आता ही कटुता दुर करून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिले आहेत.

राज्यातील दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर असून अशा कठीण काळात शेतकऱ्याला आधार देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनेकडून दुष्काळग्रस्त भागांसाठी साडेतीन लाख धान्याची किट पाठवण्यात आली होती. ही मदत त्या त्या भागात पोहोचली असून ती थेट गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहचवणे हे शिवसैनिकांचे कर्तव्य असल्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. याशिवाय, राज्य सरकारकडून जाहीर होणारी मदत प्रत्यक्षात प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचते की नाही, याची कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी असेही शिंदे यांनी सांगितले आहे.

शासकीय मदतीसाठी लागणारे अर्ज भरण्यापासून ते पंचनाम्यांच्या प्रक्रियेपर्यंत सर्व प्रशासकीय कामांत शिवसैनिकांनी शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना केले आहे. आपल्या दसरा मेळाव्यातील भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाची बळीराजाची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही, असा शब्द राज्यातील जनतेला दिला होता. हा शब्द पाळण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन शिंदे यांनी शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >