13 आखाड्यांतील संत- महंतांच्या जेवणाची जबाबदारी शिवसेना घेणार; उपमुख्यमंत्री शिंदेंनी संत संमेलनात केली घोषणा

त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडलेल्या संत संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, भगवान त्र्यंबकेश्वर आणि गोदामाईला वंदन करून देशभरातून आलेल्या संत-महंतांना अभिवादन केले.

नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळा येत्या शनिवारी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. काल अर्थात, कोजागरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर नाशिकच्या रामकुंडावर सामुहिक शंखनाद आणि गोदातिरावर गोदाआरती सुद्धा करण्यात आली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक वेगवेगळ्या संमेलनाचे आयोजन केले जात आहे. आज त्र्यंबकेश्वरमध्ये संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती.



त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडलेल्या संत संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, भगवान त्र्यंबकेश्वर आणि गोदामाईला वंदन करून देशभरातून आलेल्या संत-महंतांना अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी संत महंतांना संबोधून भाषण सुद्धा केले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ आहे. संतांच्या पायाशी नतमस्तक होऊन राज्यकारभार चालवणे हाच आमचा संस्कार आहे. साधू- संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आज संतांच्या माध्यमातून खरी दिवाळी साजरी होत आहे. हे केवळ राजकीय किंवा सामाजिक संमेलन नसून आध्यात्मिक ऊर्जेचा उत्सव आहे. ” बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी राजकारण हे समाजकारण, राष्ट्रसेवा आणि राष्ट्ररक्षणासाठी करण्याचा संस्कार दिला. राजसत्ता हातात असली तरी अध्यात्मिक आणि धर्मसत्ता मोठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



“संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि समर्थ रामदास यांच्या संस्कारांनी महाराष्ट्र घडला. संतांनी भक्तीसोबत माणुसकी, समता आणि समाजसेवा शिकवली. “जे का रंजले गांजले...” या संत तुकारामांच्या विचाराचा दाखला देत गरजूंची सेवा हाच खरा धर्म आहे. माझ्या संपूर्ण राजकीय- सामाजिक जीवनातील हा पहिलाच आणि अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. संत- महंतांचा सन्मान करण्याचे हे सौभाग्य आहे. सीएम म्हणजे कॉमन मॅन; मी कार्यकर्ता म्हणून काम केले आणि पुढेही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार, असे शिंदे म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांच्या मुलींच्या लग्नासाठी शिवसेना मदत करणार असल्याची घोषणा संत संमेलनात केली. कुंभमेळा हा केवळ श्रद्धेचा सोहळा नसून पर्यटन, व्यापार, रोजगार, पायाभूत सुविधा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा महोत्सव असल्याचे शिंदेंनी सांगितले.



“संतांची सेवा करणे हे आमचे भाग्य आहे.”, असं म्हणत, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 13 आखाड्यांतील संत- महंत आणि साधूंच्या भोजनाची व्यवस्था शिवसेनेच्या वतीने केली जाणार असल्याचे जाहीर केले. इतकंच नाही तर, कुंभाच्या कामांमुळे बाधित होणार्‍या कुटुंबांना पक्की घरे देऊन पुनर्वसन केले जाईल; कुणावरही अन्याय होणार नाही. व्यापारी, दुकानदार आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास सरकार मोबदला देणार असल्याची माहितीही शिंदेंनी दिली. साधुग्रामच्या भूसंपादन संदर्भातील तक्रारीही सोडवल्या जातील. त्र्यंबकेश्वरमध्ये स्टेडियमसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून निधीचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपरिषद प्रशासकीय भवनासाठी आवश्यक निधी देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या सहकार्याने सिंहस्थ यशस्वी करण्यासाठी सरकार पूर्ण ताकदीने काम करेल. आखाडे, साधू- महंत, भाविक आणि स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. “संतांच्या आशीर्वादाने हा कुंभ यशस्वी करू; कोणावरही अन्याय होऊ देणार नाही,” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.



संत संमेलनाला परमपूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज, महंत महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, महंत सत्यगिरी महाराज, महंत धनंजयगिरी महाराज, महंत शंकरानंद सरस्वती महाराज, महंत रमेशगिरी महाराज, महंत दुर्गानंद महाराज, महंत रामकिशोरदास शास्त्री, महंत दुर्गादास महाराज, महंत रामनवमीदास महाराज, महंत गोपालदास महाराज, संत देवेंद्रसिंह शास्त्री, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्यासह विविध आखाड्यांचे महामंडलेश्वर, संत-महंत, धर्माचार्य आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, गोकुळ गीते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, विनय करंजे, विजय आमले, प्रवीण आमले आदींसह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पक्षपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

AI मुळे नोकऱ्यांवर संकट? १० वर्षांचा अनुभव असलेल्या इंजिनिअरचा शेतीकडे वळण्याचा विचार!

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगानं वाढीमुळे अनेक तंत्रज्ञान व्यावसायिक त्यांच्या करिअरच्या भविष्याबद्दल चिंतेत

Uttarakhand CM Announcement : उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : पर्यावरण मित्रांचे 'मानधन' लवकरच वाढवणार!

देहरादूनमध्ये महर्षि वाल्मिकी प्रकटोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा देहरादून : ऋषी-मुनींची पवित्र भूमी असलेल्या

Nashik : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या मार्गांत बदल, 30 व 31 ऑक्टोबरला वाहतूक निर्बंध लागू

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड आणि नवीन घाट

खर्गेंचे पंतप्रधानांबद्दलचे वक्तव्य हे काँग्रेसच्या सडक्या मानसिकतेचे प्रदर्शन - मंत्री नितेश राणे यांची टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई-वडिलांबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेले

Nashik : शिक्षण संस्थेतील अपहार प्रकरण ; माजी मुख्याध्यापकांसह पत्नी व सुनेचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Nashik : मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बँक खात्यांमधून ७० लाख ८२ हजार

Rashmika Mandanna Vijay Deverakonda : "होय, मी माझ्या जोडीदाराच्या प्रेमात वेडी आहे..." ट्रोलर्सना रश्मिका मंदानाची ८ पानांची चपराक; तर विजय देवरकोंडाची सुद्धा ट्रोल्सवर सडकून टीका

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandhana) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांच्या नात्याबद्दल सोशल