
ठाणे: एल निनोच्या परिणामामुळे निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईची चिंता लक्षात घेता, ठाणे महानगर पालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने अलीकडेच घेतलेल्या पाण्यासंबंधीतच्या निर्णयामुळे ठाणे महानगर पालिका क्षेत्रामध्ये आता 10 टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या वॉशिंग सेंटर्सवर कार किंवा टु व्हिलर धुण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पिण्याचे पाणी, बोअरवेलचे पाणी आणि विहिरीचे पाणी वापरण्यासही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे आता ठाण्यातील वॉशिंग सेंटर्सचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
मुंबई : घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या ठाणेकरांना दिवाळीत मेट्रोची भेट मिळणार आहे. गायमुख ते कासारवडवली या मार्गावर मेट्रो सेवा ...
महापालिकेने आजच (बुधवार- 28 ऑक्टोबर) हा निर्देश जारी करून ठाणेकरांना आणि वॉशिंग सेंटर्सला पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याचे आणि अनावश्यक अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे. हे निर्बंध सर्व वाहनांकरिता लागू करण्यात आलेले आहेत. नवीन निर्बंधांनुसार, वॉशिंग सेंटर्स आणि गॅरेजेसना वाहने धुण्यासाठी पिण्याचे पाणी, बोअरवेलचे पाणी किंवा विहिरीचे पाणी न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहने स्वच्छ करण्यासाठी प्रेशर जेट्सच्या वापरालाही बंदी घालण्यात आली आहे. सणासुदीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहन चालक आपलं वाहन घेऊन वॉशिंग सेंटर वॉशिंगसाठी नेत असतात, पण आता महानगर पालिकेच्या ह्या महत्त्वाच्या निर्णयामुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
कल्याण: कल्याण- डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. केडीएमसी क्षेत्रामध्ये 18 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ...
ठाणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने असे देखील स्पष्ट केलेय की, बादलीत पाणी भरून ओल्या कापडाने वाहने स्वच्छ करण्यास परवानगी कायम राहील. पाण्याचा अतिवापर न करता वाहनांची मूलभूत स्वच्छता करता यावी आणि पाण्याचा वापर कमी व्हावा, हा या उपाययोजनेमागील उद्देश आहे. महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या वॉशिंग सेंटरवर आणि नागरिकांवर महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. एल निनोच्या संभाव्य परिणामामुळे दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊन उपलब्ध जलस्रोतांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेता, या पार्श्वभूमीवर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
मुंबई : कल्याण तालुक्यातील मौजे चिकणघर येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या दीर्घकालीन ताब्यातील जमिनीचे संरक्षण, अनधिकृत टी.डी.आर. आणि नोंदी रद्द करणे तसेच ...
पाणीटंचाई टाळण्यासाठी ठाणेकरांनी जबाबदारीने पाणी वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. शासकीय नियमांनुसार, 31 ऑगस्ट 2027 पर्यंत उपलब्ध संसाधनांच्या नियोजित व्यवस्थापनाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. या व्यापक जलसंधारण प्रयत्नांचा एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिकेने वाहने धुण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ठाणे महानगरपालिकेने रहिवाशांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आणि कमीत कमी पाण्याचा वापर करण्याचे आवाहन देखील केले आहेत. येत्या काही महिन्यांत जलस्रोतांचे व्यवस्थापन करण्याची तयारी केली जात असल्याने, उपलब्ध संसाधनांचा सर्वोत्तम वापर करण्याच्या गरजेवर पालिकेने भर दिला जात असल्याची माहिती महानगर पालिकेने दिली आहे.






