
उत्तराखंड: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये बद्रीनाथ- डेहराडून दरम्यान धावणाऱ्या एका हॅलिकॉप्टरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. बद्रीनाथ धामवरून प्रवाशांना घेऊना जाणारे हॅलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या विमान दुर्घटनेमध्ये, 5 प्रवाशांसह एका पायलट जखमी झाल्याचे वृत्त होते. पण काही वेळांपूर्वी मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातामध्ये सहा जखमी झालेल्यांपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन जण गंभीर जखमी आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचाव कार्याची सूत्रे हाती घेतली आहेत.
उत्तराखंड: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम मधून परत येत असलेले एक हॅलिकॉप्टर ...
हॅलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना बद्रीनाथ आणि ज्योतीर्मठ दरम्यान झाल्याचे वृत्त आहे. ट्रान्स भारत कंपनीच्या असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये एक पायलट आणि पाच प्रवासी असे सहा जण होते. सर्व प्रवासी बंगळूरचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर बद्रीनाथहून डेहराडूनला जात होते आणि सहस्रधारा हेलिपॅडवर उतरणार होते. हेलिकॉप्टर खडकावर आदळून कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अद्याप नेमक्या कोणत्या कारणामुळे, हॅलिकॉप्टर कोसळले? ही माहिती समोर आली नाही. SDRF, इतर पथकांसह आणि लष्कर पथक सुद्धा बचाव कार्यात आणि मदतकार्यात व्यग्र आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून, ट्रान्स भारत एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सर्व हेलिकॉप्टर्सचे सुद्धा उड्डाण रद्द करण्यात आले आहेत.
#WATCH | Uttarakhand: A team from the district administration is currently searching for the missing helicopter travelling from Badrinath to Dehradun.
Smoke was seen rising near Chaien village in Joshimath, following the disappearance of the helicopter. There are six people on board the helicopter, including five passengers and one pilot: Chamoli district administration — ANI (@ANI) October 30, 2026
पायलटसोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून घटनास्थळी आणखी एक पथक पाठवण्यात आले असल्याची माहिती उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाचे (UCADA) सीईओ प्रतीक जैन यांनी दिली. कॅप्टन हिमांशु (पायलट) आणि प्रथापा, अरुण, शंकर गौडा, सुधीर के आणि एसएस नटराजा (प्रवासी) असे सहा प्रवासी हॅलिकॉप्टरमध्ये होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अपघाताविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "जोशीमठ येथील चाई गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी बातमी मिळाली. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एसडीआरएफ हे तिन्ही पथक बचावकार्य एकत्रित रित्या करत आहेत. मी सुद्धा या संपूर्ण घटनेवर सतत लक्ष ठेवून आहे. मी गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्याचे निर्देश देत असून रुग्णांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश देत आहे. मी जखमींच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो."
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने आता नागरिकांच्या सेवेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतीय रेल्वेकडून आता कुरिअर कंपन्यांप्रमाणे ग्राहकांच्या घरून ...
नेमकी घटना काय घडली ?
खराब हवामान असूनही, शुक्रवारी बद्रीनाथसाठीची विमानसेवा सुरू होती. दुपारी 01.05 वाजता एक हेलिकॉप्टर डेहराडूनला पोहोचले. त्यानंतर दुसरे हॅलिकॉप्टर दुपारी 01.12 वाजता डेहराडूनच्या दिशेने निघाले आणि ते जोशीमठ परिसराजवळ अचानक रडारवरून बेपत्ता झाले. जोशीमठच्या मारवाडी भागाजवळील चाय गावच्या टेकडीजवळ या हॅलिकॉप्टरचा पुर्णपणे संवाद तुटला. सुरूवातीला हॅलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र तात्काळ चमोली जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान ते हॅलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळल्याचे निष्पन्न झाले.


