
उत्तराखंड: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम मधून परत येत असलेले एक हॅलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या हॅलिकॉप्टरमध्ये, पाच प्रवाशांसग पायलट अशा सहा जणांना घेऊन जाणारं एक हॅलिकॉप्टर आज बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. हॅलिकॉप्टर बेपत्ता झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर धुकं असल्यामुळे ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे. या घटनेला उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये बद्रीनाथहून जोशीमठकडे जाणारं हॅलिकॉप्टर बेपत्ता झाले आहे. पाच प्रवाशांसह एका पायलट अशा सहा जणांना घेऊन जाणाऱ्या हॅलिकॉप्टरला अचानक लोकेशन मिळानासे झाले. त्यामुळे हॅलिकॉप्टर बेपत्ता झाले. बद्रीनाथ धाम आणि जोशीमठ अशा दोन ठिकाणांदरम्यान, हॅलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी माध्यमांना दिली. हॅलिकॉप्टर अचानक गायब झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून या विमानाचा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच चमोली जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हॅलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
(बातमी अपडेट होत आहे)



