Bank Fraud Case: बँक घोटाळ्याप्रकरणी ED ची मोठी कारवाई, आणखी 53.95 कोटींची मालमत्ता जप्त

Parekh Aluminex Bank Fraud Case: अंमलबजावणी संचालनालयाने पारेख ॲल्युमिनेक्स लिमिटेड (पीएएल) शी संबंधित 2296 कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी 53.95 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate- ED) पारेख ॲल्युमिनेक्स लिमिटेड (पीएएल) शी संबंधित 2296 कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी 53.95 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी, इडीने जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 546 कोटी इतकी आहे. इडीच्या मुंबई झोन- 1 ने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) जंगम आणि स्थावर मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणली आहे. या प्रकरणात इडीने यापूर्वी जप्त केलेली मालमत्ता तब्बल 493 कोटी रुपयांची होती.



सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW), मुंबईमध्ये केलेल्या गुन्हेगारी कट आणि फसव्या कर्ज व्यवहारांद्वारे 17 बँकांच्या ग्रुपची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पारेख ॲल्युमिनेक्स लिमिटेड आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँडरिंगचा तपास सुरू केला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, पारेख ॲल्युमिनेक्स लिमिटेडने स्टॉक आणि देयक विवरणपत्रे सादर करून कन्सोर्टियमकडून कर्ज घेतले. त्यानंतर ही कर्ज खाती अनुत्पादक मालमत्ता (Non Performing Assets- NPA) बनली. त्यावर अंदाजे 2296 कोटी रुपयांची थकबाकी आहे.


 


तपासादरम्यान, ईडीला असे आढळून आले की, जेके शाह ग्रुपने विविध संस्था आणि व्यक्तींच्या माध्यमातून 110.54 कोटी रुपयांच्या गुन्हेगारी उत्पन्नाचे हस्तांतरण करण्यास कथितपणे मदत केली. हा ग्रुप गुन्हेगारी उत्पन्नाचा कथितपणे लाभार्थी देखील होता. त्यांच्या उत्पन्नातून जेके ग्रुपने विविध संस्था आणि वेगवेगळ्या व्यक्तींच्या ओळखीने काही रक्कम आपल्याकडे वळती करून घेतली. त्याला अंदाजे 70.25 कोटी रुपये मिळाले असून त्याने त्याचा वापर केल्याची माहिती ईडीने दिली आहे. तपासादरम्यान, ईडीने बँक फसवणुकीसंबंधित मनी लाँडरिंगच्या माध्यमातून पैशांचा कथित गैरवापर केला आहे का? याचा देखील तपास सुरू केला आहे.



दरम्यान, इडीकडून या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू केला आहे. CBI , मुंबई EOW आणि मुंबई EOB यांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे तपास सुरू करण्यात आला होता. पारेख ॲल्युमिनेक्स लिमिटेड आणि इतर आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 120- B आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Comments
Add Comment

स्वदेशी बनावटीच्या पहिल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम किती पूर्ण झालं? 'या' अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे ट्रेन

नवी दिल्ली: देशामध्ये तयार होणाऱ्या पहिल्या स्वदेशी बुलेट ट्रेनचे काम प्रगती पथावर आहे. यामुळे देशातील रेल्वे

Tu Mil Jaaye Song: किंग खानच्या वाढदिवशी फॅन्सला जबरदस्त गिफ्ट, 'किंग' चित्रपटातलं 'तू मिल जाए' गाणं रिलीज

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान आज त्याचा 61 वा वाढदिवस साजरा करीत आहे. शाहरूख खानच्या वाढदिवसाचे निमित्त साधत त्याच्या

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत उद्या 10 तास पाणी पुरवठा बंद, ऐरोलीसह वाशी अन्... परिसरांना बसणार फटका

नवी मुंबई: नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये 3 नोव्हेंबर अर्थात उद्या सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत अशा 10

Vande Bharat Sleeper Express: 'वाराणसी जंक्शन– नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस' उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत, कसं असेल वेळापत्रक?

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी 'वाराणसी जंक्शन–

Maharashtra Drought: मराठवाड्यातील उद्योजकांकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 6 कोटींची मदतनिधी, धनादेश मुख्यमंंत्र्यांकडे सुपूर्त

मुंबई: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यातील उद्योजकांनी पुढाकार घेत आज 6 कोटी 18 लाख रुपयांचा धनादेश आज

Smart Watch Sensor: हातातलं स्मार्टवॉच हृदयाचे ठोके कसं मोजतं? 99.9% टक्के लोकांना माहितीच नाही उत्तर...

मुंबई: सध्याच्या डिजीटल आणि आधुनिक युगात स्मार्टवॉच हे केवळ वेळ पाहण्याचे साधन न राहता प्रत्येकाच्या