Sunday, November 8, 2026

Maharashtra CM Farmer Visit: शक्य तिथे इंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करून दिवाळी साजरी केली. त्यावेळी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी त्यांनी मुक्काम केला. यावेळी बोलताना शक्य आहे तिथे इंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.

नागपूर: राज्यात एकीकडे दिवाळी सणानिमित्त आनंदाचे वातावरण आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थीतीचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना सूचित केले आहे की शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करा. त्यांना सर्वोतोपरी मदत करा. याच निमित्ताने नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करून दिवाळी साजरी केली. त्यावेळी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी त्यांनी मुक्काम केला. यावेळी बोलताना शक्य आहे तिथे इंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.

शेतकऱ्यांसमोर असलेले संकट आणि या संकटावर कशी मात करता येईल या संदर्भात त्यांनी रामभाऊ बालपाडे या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. चिंताग्रस्त शेतकऱ्यांना धीर देताना, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी गावात मुख्यमंत्री स्वतः आले. मुख्यमंत्र्यांनी शेतीमध्ये घेण्यात येत असलेल्या पिकांबद्दल व दुष्काळामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात चर्चा केली. हवामान बदलामुळे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली त्यानंतर पाऊसच पडला नाही आणि अद्यापही पाऊस नसल्यामुळे शेतातील पिकांची हानी झाली आहे. या दोन्ही प्रसंगांमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत दिली जात आहे. काटोल , नरखेड परिसरात संत्र्यासह मोसंबीचे मोठ्या प्रमाणात पीक होत आहे. परंतु बांगलादेशाने निर्बंध घातल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. या संदर्भात मिहान येथे मोठा प्रकल्प सुरू होत आहे. या पिकांवर प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहे. रब्बीचे पीक वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, या संदर्भातही शेतकऱ्यांसोबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच शेतीच्या संरक्षणासाठी कुंपण घालण्याची योजना राबविण्यात आली असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केले.

ज्या शेतकऱ्यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी मुक्काम केला होता ते शेतकरी रामभाऊ बालपाडे बोलताना, शेतकऱ्यांच्या दुःखांमध्ये सहभाग घेऊन दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री आमच्या घरी आलेत. सोबत मुक्काम केला तसेच आमच्या घरची चटणी भाकरीचा आस्वाद घेतला याचा आम्हाला अभिमान वाटला, मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला जो धीर दिला त्यामुळे आम्हाला संकटावर मात करण्याची हिंमत मिळाली अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांनी बालपाडे कुटुंबाची माहिती घेतली व शेतातील नुकसान झाल्यामुळे निश्चित मदत देण्याची ग्वाही दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >