Mihir Shah Bail Rejected: मिहीर शाहचा जामीन रद्द; साक्षीदारांची तपासणी झाल्यानंतरच जामीन अर्जावर विचार

पालघर येथील एका राजकारणी घरातील मुलगा मिहीर शाह याला 2024 च्या बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणात सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे. तसेच या प्रकरणातील साक्षीदारांची तपासणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश अभियोजन पक्षाला न्यायालयाने दिले आहेत.

Mihir Shah Bail Rejected: पालघर येथील एका राजकारणी घरातील मुलगा मिहीर शाह याला 2024 च्या बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणात सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे. तसेच या प्रकरणातील साक्षीदारांची तपासणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश अभियोजन पक्षाला न्यायालयाने दिले आहेत.


नेमक प्रकरण काय?

मिहिरने 7 जुलै, 2024 रोजी, वरळीत आपली बीएमडब्ल्यू गाडी एका स्कूटरला धडकवल्याचा आरोप आहे, ज्यात स्कूटर चालवणारी व्यक्ती प्रदीप नखवा जखमी झाले. त्यांच्यासोबत मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी कावेरी, गाडीच्या बोनेटवरून दीड किलोमीटरपर्यंत फरफटत गेल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर मिहिर घटनास्थळावरून पळून गेल्याचा आरोप आहे आणि त्यानंतर त्याला दोन दिवसांनंतर, 9 जुलै 2024 रोजी अटक करण्यात आली. अपघाताच्या वेळी गाडीत असलेला त्याचा चालक, राजरुशी बिदावत याला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली. तर मिहीरने यापूर्वी दावा केला होता की, त्याची अटक बेकायदेशीर होती कारण "अटकेची कारणे कळवण्यात आली नव्हती."



मिहीर 2024 पासून तुरुंगात आहे. त्यामुळे त्याच्या वकिलाने जामिनाची मागणी केली. मात्र, सरकारी वकील अश्विनी रायकर यांनी या याचिकेला विरोध केला आणि असा युक्तिवाद करत, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची तपासणी झाल्यानंतरच त्यांच्या जामीन अर्जावर विचार केला जाऊ शकतो, असे उच्च न्यायालयाने सांगितले.


मिहीरच्या वकिलांचा युक्तिवाद
आरोपीने “आधीच बराच मोठा काळ (एका वर्षापेक्षा जास्त) तुरुंगवास भोगला आहे आणि खटल्याची सुनावणी अद्याप ही सुरू झालेली नाही, तर दुसरीकडे 54 साक्षीदारांची तपासणी अजून करणे बाकी आहे. त्यामुळे खटल्याचा निकाल लागण्यास बराच वेळ लागेल.” तसेच शाह यांची “कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही” आणि ते मुंबईचे कायमचे रहिवासी आहेत.

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना दिलासा, शेतातील विंधन विहिरींवरील बंदी हटवली; झाडे जगविण्यासाठी मोठी घोषणा

महाराष्ट्र: सध्या राज्यभरात आणि विशेषतः ग्रामीण भागात तीव्र दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यावर मात

Big Boss 20: माही विजची सलमान खानने केली बोलती बंद! बिग बॉसच्या निर्मात्यांवरील आरोपांना चोख उत्तर

Big Boss 20: लोकप्रिय रिऍलिटी शो 'बिग बॉस 20' प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. रोज

शहाडचा रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी कायमची फुटणार, कल्याण- मुरबाड- उल्हासनगरचा प्रवास सुसाट; मेगा प्रोजेक्टला मंजुरी

कल्याण: कल्याणवरून मुरबाड आणि उल्हासनगरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी

Farmers Visit: आदिवासी पाड्यात चिमुकल्यांना भेटवस्तू देत मंत्री मंगलप्रभात लोढांनी साजरी केली दिवाळी

Mumbai:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला मध्यनजर ठेऊन राज्यातील मंत्री दुष्काळग्रस्त भागात

कस्टम अधिकारी बनून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लुटणाऱ्या बनावट टोळीचा पर्दाफाश; मुंबईत 3 जण गजाआड!

मुंबई: परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांना गाठून, बनावट ओळखपत्रांच्या आधारे त्यांची लुटमार करणाऱ्या एका

Government Schemes for Tribal Communities: एकाच छताखाली आदिवासींना मिळणार तात्काळ लाभ; न्यायाधीशांच्या उपस्थितीत भरणार शासकीय योजनांचा महामेळावा

Thane: एकाच छताखाली सर्व गरजूंना शासकीय योजनांचा लाभ ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शहापूर येथे मिळणार