
Maharashtra Weather News: महाराष्ट्रात सध्या हवामानाचा लपंडाव सुरू आहे. पहाटे आणि सकाळी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गारठा जाणवत ...
मृतांमध्ये केरळमधील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश
UAE च्या गृह मंत्रालयाने शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर मृतांची ओळख जाहीर केली. त्यानुसार, मृतांमध्ये 10 UAE नागरिक आणि चार भारतीयांचा समावेश आहे.
केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील वेंगारा येथील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी मृतांची नावे मोहम्मद अस्मिल, त्यांची जुळी बहीण मिसना झुबिन आणि तीन वर्षांचा भाचा मोहम्मद फय्याश अशी असल्याचे सांगितले.
या अपघातात गुजरातमधील 13 वर्षीय आतिफ मोहम्मद इम्रान मन्सूर याचाही मृत्यू झाला. तो कुटुंबासोबत भारतात परतण्यासाठी फुजैरा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होता. या दुर्घटनेत त्याचे आई-वडील आणि मोठी बहीण जखमी झाले असून, तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
🇦🇪 A truck crash in the UAE has killed 14 people and injured 30 others.
The driver lost control on Sheikh Khalifa bin Zayed Road in Fujairah and crashed into another vehicle. The truck then overturned and hit several vehicles that had slowed down or stopped in traffic. It caught fire, and the flames quickly spread to nearby vehicles. In total, 23 vehicles were involved. Of the 30 injured, 15 have already left the hospital, while the other 15 are still being treated. Police are investigating the accident. Source: WAM, @TabzLIVE / Writer: Daniyal — Mario Nawfal (@MarioNawfal) November 12, 2026
सात भारतीयांसह 30 जण जखमी
UAE च्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातात एकूण 30 जण जखमी झाले. यामध्ये आठ UAE नागरिक, दोन जॉर्डनचे, सात भारतीय, दोन पाकिस्तानी, तीन इजिप्शियन, सहा ओमानचे आणि दोन ब्राझिलियन नागरिकांचा समावेश आहे.
दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्याने फुजैरामधील रुग्णालयांना भेट देऊन जखमी भारतीयांची विचारपूस केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शोक व्यक्त केला. पीडित कुटुंबांना आवश्यक ती मदत दिली जात असल्याचे भारतीय दूतावासाने सांगितले.
दोन अपघातांमुळे 23 वाहनांची धडक
UAE च्या सार्वजनिक अभियोजन विभागाच्या प्राथमिक तपासानुसार, शेख खलिफा बिन झायेद रोडवर एकापाठोपाठ दोन अपघात झाले. पहिल्या घटनेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला एका वाहनाने धडक दिली.
दुसऱ्या घटनेत दोन मालवाहू कंटेनर घेऊन जाणाऱ्या ट्रकची अनेक वाहनांना धडक बसली. या धडकेनंतर ट्रक उलटला. रस्त्याच्या या भागात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने उजवी लेन बंद होती. या अपघातातील ट्रक चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौकशीनंतर त्याला अंशतः कोठडीत ठेवण्यात आल्याची माहिती आहे. या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे.






