
Danny Luo Unfair Dismissal Case: यूकेमधील एका एआय कंपनीने एका महिला डायरेक्टरला तिच्या सहकारी संचालकांनी 'अत्यंत आळशी' म्हणत तिच्यावर कार्यालयात डेस्कवर झोपणे, लवकर घरी निघून जाणे तसेच वेळेत काम पूर्ण न करणे, काम पूर्ण करण्यासाठी भरपूर वेळ घेणे असे आरोप लावण्यात आले होते. आणि तिला कंपनीने कामावरून काढून टाकले, यावर त्या महिलेने हे प्रकरण रोजगार न्यायालयात सादर केले. यावर, लंडन साऊथ एम्प्लॉयमेंट ट्रिब्युनलने असा निकाल दिला आहे की, कंपनीने तिला अन्यायपूर्वक कामावरून काढून टाकले होते. तसेच तिच्या कामगिरीबद्दल व्यक्त झालेल्या चिंता योग्यरित्या हाताळण्यासाठी किंवा तिच्या आणि दुसऱ्या संचालकामधील वाद मिटवण्यासाठी कंपनीने योग्य पावले उचलली नाहीत.
नेमकं प्रकरण काय?
डॅनी लुओ या 46 वर्षीय महिलेच्या बाबतीतील हे प्रकरण आहे. या आधी डॅनी चीनमध्ये वैद्यकीय डॉक्टर म्हणून काम करत होते. त्यानंतर 2020 मध्ये, त्या यूकेला स्थलांतरित झाल्या. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये त्या ब्लू स्ट्रॉबेरी एआय या कंपनीमध्ये जॉईन झाल्या. ही कंपनी याआधी कँडरबरी एआय म्हणून ओळखली जात होती. डॅनी लुओ या कंपनीत मीडिया मॅनेजमेंट आणि मार्केटिंग विभागात काम करत होत्या. तसेच लुओ यांनी कंपनीत मोठी गुंतवणूक देखील केली होती. त्यामुळे त्या कंपनीच्या शेअर होलेडर, डायरेक्टर आणि कर्मचारी आहेत. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, लुओ यांना कोणताही पूर्व व्यावसायिक अनुभव नाही याची कंपनीला जाणीव होती. त्यांचा प्रवास हा डॉक्टरपासून ते एआय कंपनीच्या संचालकापर्यंत असा आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये, कंपनीचे दुसरे डायरेक्टर वेस्ली बेकर यांनी लूओ यांना ईमेल करून त्यांच्या कामातील चुकांबद्दल चिंता व्यक्त केली. तीन महिन्यांनंतर, त्या दोघांनी त्यांच्या कामगिरीवर आणि कामाच्या वेळेचा कामाव्यतिरिक्त वापर करण्यावर चर्चा केली. त्यानंतर बेकर यांनी, लूओ यांची कंपनीतील गुंतवणूक करणाऱ्या 'पॉल मॉल इन्व्हेस्टमेंट्स' या संस्थेला पत्र लिहून त्यांच्या योगदानाबद्दल तक्रार केली.
Aadi Anant Marathi Movie: आजोबा-नातवाच्या नात्यातील भावविश्व उलगडणारा आणि नात्यांचं महत्त्व अधोरेखित करणारा पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ हा चित्रपट ...
ईमेलमध्ये, त्याने तिच्या कामाप्रती असलेल्या वचनबद्धतेचे वर्णन "शाळा सोडलेल्या किंवा शाळेतील शिकाऊ उमेदवाराच्या" पातळीचे असल्याचे सांगितले. तसेच ती एक अत्यंत आळशी स्त्री आहे, असे देखील सांगितले. त्यानंतर जुलै 2022 मध्ये, बेकरने लुओला थेट आणखी एक ईमेल पाठवला, ज्यात तिच्यावर डेस्कवर झोपणे, लवकर घरी जाणे आणि कामे पूर्ण करण्यासाठी खूप जास्त वेळ घेणे. “मी तुम्हाला स्वतः तुमच्या डेस्कवर झोपताना, आडवे होताना, अनेकदा लवकर निघून जाताना पाहिले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोणतेही काम करण्यासाठी खूप वेळ घेताना आणि तेही अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करताना पाहिले आहे.”, असे आरोप लिओ यांच्यावर लावण्यात आले होते.
लंडन साऊथ एम्प्लॉयमेंट ट्रिब्युनलने काय सांगितले?
जज जेम्मा कॉथ्रे यांनी निर्णय देताना, कंपनीने लुओ यांच्या कामगिरीबाबतची चिंता योग्य प्रकारे हँडल करण्यासाठी योग्य पावले उचलण्यात कंपनी अयशस्वी ठरली आहे. तसेच त्यांनी दुसऱ्या डाटरेक्टरसोबतचा वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. कंपनीने लुओ यांना एका अनिश्चित स्थितीत सोडून दिले आहे. लुओ यांना कंपनीतून काढून टाकणे, त्यांचा पगार न देणे आणि वकीलांच्या नोटीसला उत्तर न देणे या सर्व गोष्टी पाहून ट्रिब्युनलने लुओ यांना चुकीच्या पद्धतीनं काढून टाकल्याची तक्रार ग्राह्य धरली आहे. तसेच कंपनीने नोटीस वेतन दिलं नाही आणि 4,333 पाऊंड सॅलरी देखील बेकायदेशीरपणे कापली होती. तसेच चुकीच्या पद्धतीने काढून टाकल्याबद्दल लुओ यांना अतिरिक्त नुकसान भरपाई ही लवकरच मिळेल.






