काय म्हणाले कपिल देव?
माजी क्रिकेटपटू कपिल देव म्हणाले की, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणं ही विराट कोहलीची सर्वात मोठी चूक आहे. विराट कोहली 10 वर्षांनी जेव्हा या निर्णयावर विचार करेल तेव्हा त्याला नक्कीच पश्चाताप होईल. विराट कोहली या टप्प्यावरही एका 25 वर्षीय खेळाडूला आव्हान देऊ शकला असता. पण त्याने रागाच्या भरात निवृत्ती घेणं योग्य नाही. कपिल देव यांनी सांगितलं की, 'माझ्या नजरेत विराट कोहलीने कसोटीतून निवृत्ती घेऊन मोठी चूक केली आहे. त्याला दहा वर्षांनी या निर्णयाचा पश्चाताप होईल. त्याने निवृत्ती घ्यायला नको होती. कोहलीकडे जबरदस्त फिटनेस आहे आणि अन्य खेळाडूंच्या तुलनेत त्याची फिटनेस लेव्हल वेगळी आहे.'
आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, सलामीवीराचा स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय!
आयपीएल 2027 स्पर्धेसाठी मिनी लिलाव प्रक्रिया डिसेंबर महिन्यात पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियेपूर्वी ट्रेड विंडोचा बाजार गरम झाला आहे. हार्दिक पांड्या ...
रागाच्या भरात निर्णय घेणं योग्य नाही...!
माजी क्रिकेटपटू कपिल देव म्हणाले की, 'रागाच्या भरात निवृत्तीचा निर्णय घेणं योग्य नाही. त्याने मोहिंदर अमरनाथसारखं असलं पाहीजे, त्याला अनेकदा संघातून ड्रॉप केलं गेलं. पण त्याने पुनरागमन करून सर्वांना चुकीचं ठरवलं.' कपिल देव यांनी पुढे सांगितलं की, 'जर तो खेळू शतक असले तर चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी (निवडकर्त्यांनी) निर्णय घेतला तर त्याचं करिअर संपेल. मी ही बाब निवडकर्त्यांवर सोडतो. कारण ते भारताच्या चांगल्यासाठी निर्णय घेतील.' कपिल देव यांनी रोहित शर्माबाबत सांगितलं की, सचिन तेंडुलकर असो की धोनी किंवा गावस्कर हे सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत. त्याच प्रमाणे रोहित शर्माच्या करिअरचा एक दिवस शेवट होईल.