Wednesday, November 18, 2026

Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मालेगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक तर महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना अटक

मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील गाजलेल्या व शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या आरोपावरून मालेगाव येथील प्रसिद्ध मालेगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक जाहिद हुसेन मोहम्मद अली (रा. रौनकाबाद) तसेच येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे यांना जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेन मंगळवारी अटक केली. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

८ महिलांसह १२ संशयित फरार

मालेगाव हायस्कूलच्या शिक्षीका जैनम मोहंमद, सिमा निहाल दुलार यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात तब्बल पावणेतीन कोटींचा घोटाळा उघडकीस आल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे चौकशीसाठी आला. यात संस्थेचे अध्यक्ष इस्हाक जरीवाला, मुख्याध्यापक जाहिद हुसेन, लिपीक नासीर हुसेन, अबु हुरैरा, मध्यस्थ नवीद सगीर १३ जणांचा समावेश आहे. ८ महिलांसह १२ संशयित फरार आहे. यातील पाच संशयित शिक्षकांना १३ महिन्याचे अटकेनंतर जामीन मंजूर झाला आहे.

तर येथील कर्मवीर या. ना. जाधव विद्यालयात चार कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर नियुक्ती करून बोगस 'शालार्थ आयडी' तयार केल्याप्रकरणी वडगे यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जाधव विद्यालयात जागा रिक्त नसताना नियमबाह्य पद्धतीने चार कर्मचाऱ्यांची बेकायदा भरती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांचे बोगस 'शालार्थ आयडी' मिळवून शासनाची फसवणूक करत मागील वेतन बिलाचा फरक आणि वेतन निश्चिती करण्यात आली होती. ​माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली.

माहिती कार्यकर्ते शेखर पाटील यांनी मे २०२५ मध्ये छावणी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यात वडगे यांच्यासह तत्कालीन शिक्षणाधिकारी ​नितीन बच्छाव, निवृत्त मुख्याध्यापक ​हिरालाल वाघ, वरिष्ठ लिपिक नीलेश वडगे, सचिव ​जिभाऊ अहिरे, नितीन सूर्यवंशी, राजेंद्र निकम, विनायक खैरे व अन्य दोघांचा समावेश आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >