जमिनीवर आदळला, पण चेंडू सुटू दिला नाही! ध्रुव जुरेलने पकडला अप्रतिम झेल, प्रसिद्ध कृष्णाच्या खात्यात मोठी विकेट Watch Video
भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना वेलिंग्टन येथे सुरू आहे. या सामन्यातवर भारताची मजबूत पकड असून विजयापासून 8 विकेट दूर आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात भारताला हेनरी निकोल्सची विकेट स्वस्तात मिळाली. याचं श्रेय जातं ते ध्रुव जुरेलला...
November 22, 2026 03:40 PM
जमिनीवर आदळला, पण चेंडू सुटू दिला नाही! ध्रुव जुरेलने पकडला अप्रतिम झेल, प्रसिद्ध कृष्णाच्या खात्यात मोठी विकेट Watch Video (Photo: BCCI Twitter)
भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू असून निर्णायक स्थितीत आहे. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 2 गडी गमवून 119 धावा केल्या. अजूनही न्यूझीलंडचा संघ 233 धावांनी पिछाडीवर आहे. या धावा गाठल्यानंतर भारताला विजयी आव्हान देता येईल. असं असताना चौथ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात ध्रुव जुरेलच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे भारताच्या खात्यात एक विकेट गेली. त्याने घेतलेला झेल अप्रतिम होता. हेनरी निकोल्स पहिल्या डावात भारतासाठी डोकेदुखी ठरला होता. हेनरी निकोल्सने पहिल्या डावात नाबाद 175 धावांची खेळी केली होती. त्यामुळे दुसऱ्या डावात त्याला झटपट बाद करण्याचं आव्हान होतं. ही कामगिरी ध्रुव जुरेलमुळे चोख पार पडला. दुसऱ्या डावात हेनरी निकोल्स फक्त 31 धावा करून बाद झाला. निकोल्सची विकेटसाठी भारताने एक वेगळी रणनिती आखली होती. ही रणनिती कामी आली. भारतीय गोलंदाज त्याला राउंड द विकेटने आता येणारा चेंडू टाकला. प्रसिद्ध कृष्णाने 23व्या षटकाचा पहिला चेंडू टाकला आणि त्याची ही रणनीती यशस्वी ठरली.
ध्रुव जुरेलचा अप्रतिम झेल
डावखुरा निकोल्स आत येणारा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. पण हा चेंडू बॅटच्या आतच्या कडेला लागून थाय पॅडला लागला आणि हवेत उडला. शॉर्ट लेग उभ्या असलेल्या ध्रुव जुरेलने ही संधी साधली. पण हा चेंडू त्याच्यापासून खूपच लांब होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता हवेत उडी घेतली आणि उजव्या हातात झेल पकडला. ध्रुव जुरेलने झेल घेतल्याचं पाहून निकोल्स नाराज झाला. कारण चुकीचा फटका आणि अप्रतिम झेल घेतल्याने तंबूत परण्याशिवाय पर्याय नव्हता. हा झेल पकडताना जुरेल जोरात जमिनीवर आदळल्यामुळे त्याच्या कंबरेला दुखापत झाली आणि तो काही वेळ वेदनेने विव्हळताना दिसला, मात्र त्याने चेंडू हातातून सुटू दिला नाही.
Dhruv Jurel channeling his inner Eknath Solkar to pull off that absolute screamer! 😵
Watch the HERO VIDA India Tour of New Zealand, 1st Test Day 4, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.
#SonySportsNetwork #SonyLIV #NZvIND https://t.co/JB9nxOld2x
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) November 22, 2026
भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू असून निर्णायक स्थितीत आला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 119 धावांवर 2 ...
ध्रुव जुरेलने फलंदाजीतही दिलं योगदान
ध्रुव जुरेलला या सामन्यात मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचं सोनं केलं. ध्रुव जुरेलने ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरसोबत अर्धशतकी भागीदारी केली. ध्रुव जुरेलने ऋषभ पंतसोत 84 चेंडूत 75 धावांची भागीदारी, तर वॉशिंग्टन सुंदरसोबत 59 चेंडूत 54 धावांची भागीदारी केली. ध्रुव जुरेलने 79 चेंडूत 9 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 78 धावांची खेळी केली.