Saturday, November 21, 2026

Yuzvendra Chahal in BJP: क्रिकेटपटू युजवेंद्र चहलचा भाजपमध्ये प्रवेश; ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून निवड

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याने शनिवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला असून त्याची भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 'विशेष निमंत्रित सदस्य' म्हणून दिल्लीतून निवड करण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल याने शनिवारी (२१ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजप ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीवर विशेष निमंत्रित म्हणून निवड झाल्यानंतर तो पक्षात सामील झाला. भाजपने शनिवारी पक्षाच्या ओबीसी मोर्चातील राष्ट्रीय पदाधिकारी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि इतर नियुक्त्यांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये चहलच्या नावाचाही समावेश होता.

पक्षात सामील झाल्यानंतर यूव्ही चहलने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक भाजप नेत्यांचे आभार मानले. 'भाजप परिवारात मला स्थान दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरपाल मौर्य यांचे मनःपूर्वक आभार मानतो,' असे त्याने X वर पोस्ट केले. पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार या यादीमध्ये देशभरातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे सात राष्ट्रीय उपाध्यक्ष, तीन राष्ट्रीय महासचिव आणि सात राष्ट्रीय सचिवांचा समावेश आहे.

दिल्लीचे प्रतिनिधित्व करत चहल यांची ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीवर विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  इतर दोन विशेष निमंत्रितांमध्ये ओडिशाचे अद्वैत चरण गणनायक आणि उत्तर प्रदेशच्या वकील सीमा समृद्धी कुशवाह यांचा समावेश आहे. चहलने आतापर्यंत भारतासाठी ७२ एकदिवसीय आणि ८० टी २० सामने खेळले असून दोन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे १२१ आणि ९६ बळी घेतले आहेत. तसेच त्याने आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळताना २३३ बळीही मिळवले आहेत.

प्रमुख नियुक्त्या :

ओबीसी मोर्चासाठी एकूण ७ राष्ट्रीय उपाध्यक्ष नेमण्यात आले आहेत. यामध्ये आसाममधून जोगेन मोहन, ओडिशामधून ममता मोहंता, उत्तर प्रदेशमधून संगम लाल गुप्ता, महाराष्ट्रातून बबनराव रावजी चौधरी, दिल्लीतून सत प्रकाश राणा, बिहारमधून डॉ. अर्जुन साहनी आणि उत्तर प्रदेशमधून संगीता बलवंत बिंद यांचा समावेश आहे. गजेंद्र यादव, प्रमोद माधवराज, ललित चंद्राकर यांचं राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामंत्री पदावर दिल्लीचे गजेंद्र यादव, कर्नाटकचे प्रमोद मध्वराज आणि छत्तीसगडचे ललित चंद्राकार यांची नियुक्ती झाली आहे. तर राष्ट्रीय मंत्री म्हणून गुजरातचे दशरथजी ठाकोर, तामिळनाडूचे टी. वरथराजन, झारखंडचे संजीव कुमार उर्फ बबलू भगत, हरियाणाच्या सरिता जांगिड, तेलंगणाचे कडगंची रमेश, मध्य प्रदेशचे वैभव पवार आणि बिहारचे भीम कुमार साहू यांना जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशचे राधेश्याम यादव यांना राष्ट्रीय कोषाध्यक्ष, दिल्लीचे संजय कुमार गुर्जर यांना राष्ट्रीय कार्यालय मंत्री, तर डॉ. अरुण यादव यांना सह-कार्यालय मंत्री करण्यात आलं आहे. बिहारचे अजय गुप्ता मीडिया संयोजक, दिल्लीचे परीक्षित डागर सोशल मीडिया संयोजक आणि मध्य प्रदेशचे प्रदीप माहौर सोनी सोशल मीडिया सह-संयोजक असतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा