
मुंबई: FSSAI ने बाटली बंद पिण्याच्या पाण्याची असलेल्या 'बिसलेरी' कंपनीच्या विरोधात खटला चालवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. FSSAI ने 'बिसलेरी' कंपनीच्या बाटली बंद असलेले पिण्याचे पाणी असुरक्षित असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर आता 'बिसलेरी' कंपनीने आता एक निवेदन जारी करून आपले पाणी पिण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे, आणि FSSAI मधील हे प्रकरण सुमारे 14 महिने जुने असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
PUC Validity Check: जर तुम्ही कार किंवा बाईक चालवत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता तुम्ही घरबसल्या तुमच्या फोनच्या एका क्लीकवर तुमच्या गाडीची पीयूसी ...
'बिसलेरी' कंपनीने दिलेल्या निवेदनामध्ये नमुद केले की, सप्टेंबर 2025 मधील असून कंपनीच्या गोव्यातील प्लांटमध्ये उत्पादित केलेल्या एका बॅचसंबंधित संपूर्ण प्रकरण आहे. 'बिसलेरी'चे देशामध्ये एकूण 143 प्लांट आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर 2025 रोजी FSSAIने गोवा युनिटमधून सहा नमुने गोळा केले होते. प्राथमिक चाचण्यांमध्ये असे दिसून आले की, पाच नमुने व्यवस्थित होते, ते सर्व मानकांची पूर्तता करत होते. सहाव्या नमुन्यात ब्रोमेटची पातळी प्रति लिटर 12 मायक्रोग्रॅम होती, जी प्रति लिटर 10 मायक्रोग्रॅमच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे.
Bisleri International Pvt. Ltd. issues statement after the Food Safety and Standards Authority of India (FSSAI) had sanctioned prosecution against Bisleri International Pvt. Ltd. under the Food Safety and Standards Act, 2006, after a sample of its packaged drinking water failed safety tests.
"We are aware of recent media reports that the Food Safety and Standards Authority of India (FSSAI) has issued a notice to Bisleri. The matter dates back approximately 14 months, to a batch produced in September 2025 at Bisleri’s Goa manufacturing facility, one of 143 plants in our network. On 30 September 2025, FSSAI collected six samples from the Goa facility. Initial testing found that five samples met all applicable standards. The sixth recorded a bromate level of 12 micrograms per litre, against the prescribed limit of 10 micrograms per litre. Following Bisleri’s appeal dated 22 November 2025, FSSAI sent that sample to a referral laboratory for retesting. The referral laboratory found bromate of the sample within the prescribed limit and separately flagged polynuclear aromatic hydrocarbons (PAHs) in the sample. The difference between the two results raised questions that Bisleri believed warranted clarification. Bisleri arranged for the same sample to be tested independently at an FSSAI-approved laboratory. That test found bromate within the prescribed limit. We submitted the independent test results to FSSAI’s Western Regional Office with a formal letter dated 2 February 2026. We received no further communication from FSSAI after that submission and understood the matter to be closed. To date, Bisleri has received no notice by email or in hard copy and has been unable to locate the reported notice on FSSAI’s website. Drinking water safety is a priority for Bisleri. We maintain stringent quality controls of over 90 tests across our 10-step manufacturing process and will continue to cooperate with FSSAI to address the matter through the appropriate regulatory process. A trusted brand for years, Bisleri remains safe for consumption..." — ANI (@ANI) November 23, 2026
22 नोव्हेंबर, 2025 रोजी कंपनीने केलेल्या अपीलनंतर, नमुना पुनर्तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. बिस्लेरीच्या म्हणण्यानुसार, तपासणीवेळी नमुन्यामध्ये प्रयोगशाळेला ब्रोमेटची पातळी विहित मर्यादेत आढळली, परंतु त्यांनी स्वतंत्रपणे पॉलिन्यूक्लियर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) ची नोंद केली. या विसंगतीमुळे, बिस्लेरीने FSSSAI मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत एक स्वतंत्र चाचणी करुन घेतली, ज्यात देखील ब्रोमेटची पातळी एक सारख्या मर्यादेत आढळली. 2 फेब्रुवारी 2026 रोजी बिसलेरीला मिळालेल्या पत्राद्वारे FSSAI च्या पश्चिम प्रादेशिक कार्यालयाला स्वतंत्र तपास अहवाल सादर केला होता. त्यानंतर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, कंपनीला हे प्रकरण बंद झाल्याचे वाटले. बिस्लेरीच्या म्हणण्यानुसार, FSSAI ने अद्याप ईमेलद्वारे किंवा छापील स्वरूपात कोणतीही सूचना मिळालेली नाही आणि FSSAI च्या वेबसाइटवरही अशी कोणतीही सूचना दिसत नाही.
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. आईच्या निधनाचे दु:ख ...
कंपनीने पुढे दिलेल्या माहितीनुसार, "पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता ही 'बिसलेरी' कंपनीसाठी ही एक प्राथमिकता आहे. आम्ही आमच्या 10 टप्प्यांच्या उत्पादन प्रक्रियेदरम्यान 90 हून अधिक चाचण्यांद्वारे कठोर गुणवत्ता नियंत्रण राखतो. योग्य नियामक प्रक्रियेद्वारे हे प्रकरण सोडवण्यासाठी FSSAI ला सहकार्य करत राहू. अनेक वर्षांपासून एक विश्वासार्ह ब्रँड असलेले 'बिसलेरी' पिण्यासाठी सुरक्षित आहे." FSSAI ने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, बाटली बंद पिण्याच्या पाण्याचा (मिनरल वॉटर वगळता) नियामक नमुना विहित ब्रोमेट मर्यादेचे पालन करत नसल्याने एफएसएस कायदा, 2006 अंतर्गत तो असुरक्षित घोषित करण्यात आला होता. FSSSAI च्या मते, कंपनीच्या अपीलवर, संदर्भित PAHs च्या उपस्थितीमुळे नमुना असुरक्षित असल्याचे घोषित केले. याच्या आधारावर, बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध खटला चालवण्याची परवानगी दिली आहे.




