
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. आईच्या निधनाचे दु:ख असतानाच त्यांनी आता आईसाठी खास भावनिक पत्र लिहिले आहे. 'योगी की पाती' या मथळ्याखाली योगी आदित्यनाथ यांनी आईला भावनिक पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही तासांपूर्वीच त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर हे पत्र शेअर केलेले आहेत. त्यांनी शेअर केलेल्या पत्रामध्ये त्यांनी जेव्हा संन्यास घेतला होता, त्या दरम्यानची आठवण शेअर केली आहे.
Asia Power Index 2026 : आशियातील सर्वात शक्तिशाली देश कोणता? या प्रश्नाचे उत्तर देणारा २०२६ चा 'एशिया पॉवर इंडेक्स' जाहीर झाला आहे. या यादीत भारताने मोठी झेप घेत जपान ...
भावनिक पत्रामध्ये, योगी आदित्यनाथ यांनी लिहिलंय की, "मी हे लिहित असलेलं पत्र प्रत्येक आईला समर्पित आहे, जिच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करता येणं अशक्य आहे. जिच्याशिवाय ही संपूर्ण सृष्टीच अस्तित्वात नसती आली. माता केवळ जन्म देणारी नसते, तर ती संपूर्ण सृष्टीचा उगमस्थान आहे. अगदी साक्षात ईश्वराला सुद्धा आई आहे. आज, प्रत्येक मातेच्या स्मरणात माझे डोळे पाणावले आहेत. भगवान श्रीराम वनवासाला निघाले तेव्हा माता कौसल्येने दिलेला आशीर्वाद किंवा मथुरेच्या कारागृहातून गोकुळापर्यंतचा भगवान श्रीकृष्णाचा प्रवास, जो त्यांच्या मातेच्या इच्छेनुसार घडला, अथवा मातेचे संगोपन आणि तिने दिलेले संस्कार... ज्यांच्या बळावर एखादे बालक ध्रुव, प्रल्हाद किंवा एक आदर्श मानव बनू शकते, हे सर्व आईच्या संस्काराचेच फळ आहे. आई कोणाचीही जागा घेऊ शकते, परंतु तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मातेचे प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे.
सनातन संस्कार मातृ वंदना से अभिसिंचित हैं। कुछ ऋण ऐसे होते हैं, जो कभी चुकाए नहीं जा सकते। हां, हम अपना कर्तव्य अवश्य निभा सकते हैं। सार्वजनिक जीवन में आने के बाद प्रदेश की मातृशक्ति के लिए यही कर्तव्य निभाने का प्रयास कर रहा हूं।
प्रत्येक माँ के प्रति सच्चा सम्मान यही होगा कि आज हर प्रदेशवासी यह संकल्प ले कि वह किसी निराश्रित माँ का संबल बनेगा, किसी वंचित माँ की पीड़ा को समझेगा और किसी दुखियारी माँ के चेहरे पर मुस्कुराहट लाएगा। — Yogi Adityanath (@myogiadityanath) November 23, 2026
मातेचे निधन होणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचे जाणे नव्हे, तर आपल्या भावनिक सुरक्षिततेचा, बिनशर्त प्रेमाचा आणि घराच्या त्या संरक्षक छायेचा कायमचा लोप होणे होय. जेव्हा माझी पूजनीय माता, माझी पहिली गुरू, जिने मला अक्षरांची ओळख करून दिली, ती या जगातून कायमची निघून गेली, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर एक प्रसंग उभा राहिला. संन्यास घेतल्याच्या तीन वर्षांनंतर, मी भगव्या वस्त्रात माझ्या घराच्या उंबरठ्यावर उभा होतो. गोरखपूरहून पंचूरच्या प्रवासात असताना, माझ्या मनात भावनांचा एक मोठा पूर आला होता. संन्यासाच्या पवित्र परंपरेनुसार, मी 'भिक्षा' मागण्यासाठी साद घातली. माझा आवाज ऐकून माझी आई बाहेर आली. जे ती पाहत होती, त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती काही बोलण्यापूर्वीच मी म्हटले, "आई, मला भिक्षा दे." स्वतःला सावरत ती म्हणाली, "बाळा, तू स्वतःची ही काय अवस्था करून घेतली आहेस? घरात कशाची कमतरता होती का, की तुला भिक्षा मागण्याची वेळ आली?"
मुंबई: व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पाण्याचे एक वेगळेच स्थान आहे. शुद्ध आणि चांगल्या दर्जाचे पाणी पिण्यासाठी आपण बऱ्याचदा साध्या पाण्याचा वापर न करता ...
मी उत्तर दिले, "आई, संन्यास हा माझा धर्म आहे. एका योगीची भूक केवळ भिक्षेद्वारेच पूर्ण होऊ शकते. मी इथे राहण्यासाठी आलेलो नाही. मी भिक्षा मागण्यासाठी आलो आहे. तू जे काही देशील, त्याने माझा उद्देश पूर्ण होईल." एका संन्याशाचा मार्ग निवडणाऱ्या आपल्या मुलाच्या निश्चयाचा, आईने प्रेमाने आदर केला. सनातन परंपरांमध्ये मातृत्वाप्रती आदरभाव खोलवर रुजलेला आहे. काही ऋण अशी असतात जी कधीही पूर्णपणे फेडता येत नाहीत. तरीही, आपण आपली कर्तव्ये नक्कीच पार पाडू शकतो. सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्यापासून, मी आपल्या राज्यातील मातांप्रती हेच कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक मातेचा खरा सन्मान तेव्हाच होईल, जेव्हा राज्यातील प्रत्येक नागरिक आज असा संकल्प करेल की, तो एखाद्या निराधार मातेचा आधारस्तंभ बनेल, वंचित मातेच्या दुःखात सहभागी होईल आणि संकटात सापडलेल्या मातेच्या चेहऱ्यावर हास्य फुलवेल. तुमचा योगी आदित्यनाथ" मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेअर केलेल्या भावनिक पत्राची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.




