
लग्नसराईचा हंगाम जवळ येत असताना सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. अशातच आज जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर स्थिर राहिले आहेत, मात्र चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
जळगावमध्ये सोमवारी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख २६ हजार रुपये होता. मंगळवारीही हाच दर कायम आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. मात्र, चांदी खरेदी करणाऱ्यांना आज अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सोमवारी प्रति किलो १ लाख ५५ हजार रुपये असलेली चांदी आज ३ हजार रुपयांनी महागली असून, तिचा दर १ लाख ५८ हजार रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय आणि वायदा बाजारातही सोने-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे.
मुंबई : गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याप्रकरणी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात 199 अधिकाऱ्यांची नावे सादर केली आहेत. ...
MCX वरील दरांनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ३.४८ टक्क्यांची वाढ झाली असून, सोने प्रति १० ग्रॅम १ लाख २६ हजार २१ रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीच्या दरात ४.३२ टक्क्यांची वाढ झाली असून, चांदीचा भाव प्रति किलो १ लाख ५४ हजार २०५ रुपयांवर गेला आहे. दुसरीकडे, IBJA च्या आकडेवारीनुसार २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख २४ हजार ९४५ रुपये, तर चांदीचा दर प्रति किलो १ लाख ५२ हजार ६२५ रुपये नोंदवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव ३ हजार ६४४ डॉलर प्रति औंस, तर चांदीचा भाव ४३.५८ डॉलर प्रति औंस इतका आहे.
दरम्यान, आज गुरु नानक जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद असल्याने सराफा बाजारातील अधिकृत दरांमध्येही बदल होण्याची शक्यता मर्यादित आहे. आता आगामी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होते की दरात घसरण पाहायला मिळते, याकडे सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष लागले आहे.





