
लखनौ: उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये कायदा- सुव्यवस्थेला आणि खाकी वर्दीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून आलेल्या एका व्यापाऱ्याकडील कोट्यवधी रुपयांचे सोने लुटण्याचा कट रचल्याप्रकरणी पोलीस विभागातील आणि केंद्रीय तपास यंत्रणा डीआरआयशी संबंधित कर्मचाऱ्यांचा सहभाग उघड झाला आहे. या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत लखनौ गुन्हे शाखा आणि संयुक्त पोलीस आयुक्त (कायदा- सुव्यवस्था) यांच्या पथकाने मोठी कारवाई करत दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण पाच आरोपींना गजाआड केले आहे. मात्र, या प्रकरणात जौनपूर पोलिसांच्या एका शिपायाचाही समावेश असून तो सध्या फरार असल्याची माहिती आहे.
Delimitation Bill: सरकारने लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आली आहे. सरकारी कामकाज तातडीने करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे, ...
प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीचा एक व्यापारी सोन्याचे दागिने तयार करून घेण्यासाठी जौनपूरला आला होता. याच दरम्यान जौनपूरमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्याला या व्यापाऱ्याकडे मोठ्या प्रमाणावर सोने असल्याची माहिती मिळाली. या कर्मचाऱ्याने व्यापाऱ्याच्या हालचाली आणि त्याच्याकडील सोन्याबाबत गुप्त माहिती फोडल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने लखनौ पोलीस दलात कार्यरत असलेल्या आपल्या सहकारी शिपायाशी चर्चा करून ते सोनं चोरी करण्याचा सविस्तर कट रचला. व्यापाऱ्याचा प्रवास आणि त्याच्याकडील मौल्यवान सोन्याची माहिती हेच या संपूर्ण कटाचे मुख्य सूत्र ठरले. पूर्व नियोजित कटाचा भाग म्हणून लखनौच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यापाऱ्याला लक्ष्य करण्यात आले.
तेलंगणामध्ये एक संतापजनक आणि खळबळजनक घटना घडली आहे. बापानेच पोटच्या लेकीचा खून केल्याच्या घटनेमुळे आदिलाबाद जिल्हा हादरून गेला आहे. आपल्या लेकीचे ...
व्यापारी बसमधून प्रवास करत असताना आरोपींनी संधी साधून त्याच्याकडील सोने चोरी करण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्यात काही खाजगी व्यक्तींची आणि इतर कर्मचाऱ्यांचीही साथ असल्याचे तपासात पुढे स्पष्ट झाले आहे. जौनपूर येथून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच लखनौमध्ये ही मोठी लूट पार पाडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या धक्कादायक खुलाशामुळे पोलीस आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. लखनौ गुन्हे शाखा आणि संयुक्त पोलीस आयुक्त पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये लखनौच्या गौतमपल्ली पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेला शिपाई दुर्गेश कुमार, याशिवाय महसूल गुप्तचर संचालनालय संबंधित असलेल्या मल्टी टास्किंग स्टाफचा कर्मचारी अविनाश शाही यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भारतीय सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कधी सोन्याच्या दरात मोठी वाढ ...
दोघांवरही व्यापाऱ्याला लुटण्याचा कट रचणे आणि प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी असण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी प्रीतम सोनी आणि तिलक मांझी या दोघांनाही अटक केली असून, दोघांनी व्यापाऱ्याची माहिती गोळा करणे आणि खबरी म्हणून काम केल्याचे समोर आले आहे. तसेच सुरक्षा रक्षक राहुल चौहान यालाही पोलिसांनी अटक केली आहे. अशा प्रकारे लखनौ पोलिसांचा एक शिपाई, डीआरआयचा कर्मचारी, दोन कथित खबरी आणि एक सुरक्षा रक्षक अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, व्यापाऱ्याची माहिती कथितपणे लीक करणारा जौनपूर पोलिसांचा शिपाई, त्याचा भाऊ आणि त्यांचा एक साथीदार हे तिघेही अद्याप फरार आहेत. पोलीस या तिघांचा कसून शोध घेत असून, लुटमारीचा हा संपूर्ण कट कसा रचला गेला आणि कोणाचा नेमका काय सहभाग होता, याचा सखोल तपास सुरू आहे.





