Tuesday, September 22, 2026

Mumbai Water Supply : मध्य वैतरणा तलाव भरला ; भातसाही रांगेत

Mumbai Water Supply : मध्य वैतरणा तलाव भरला ; भातसाही रांगेत

तलाव क्षेत्रात ९७.७७ टक्के पाणीसाठा

मुंबई (विशेष प्रतिनिधी.) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तानसा, मोडक सागर, विहार आणि तुळशी हे चार तलाव भरल्यानंतर आता मध्य वैतरणा तलावही भरून वाहू लागला आहे. तर भातसा तलाव ९९.४६ टक्के भरला असल्याने तो कोणत्याही क्षणी भरून वाहू लागणार आहे. त्या नंतर फक्त अप्पर वैतरणा तलाव भरणे बाकी राहील. सर्व सातही तलावात मिळून एकूण ९७.७७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे

मागील २३ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री २.०७ वा. मोडक सागर हा चौथा तलाव भरल्यानंतर जवळजवळ दोन महिने उलटले तरी उर्वरित अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा या तीन पैकी एकही तलाव भरलेला नव्हता. मात्र १४ सप्टेंबर रोजी विघ्नहर्ता श्रीगणेशाचे आगमन झाल्यानंतर तलाव क्षेत्रात अधूनमधून चांगला पाऊस पडण्यास सुरुवात झाली आणि २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजेपर्यंत मध्य वैतरणा तलाव १०० टक्के भरला आहे. तर भातसा तलाव देखील भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या भक्तीवर प्रसन्न होवून श्रीगणेशाने मुंबईकरांवर ओढवलेले पाणी संकट दूर करण्यास मदत केली आहे.

मुंबईला दररोज सात तलावांमधून सध्या ४१०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणीसाठा ६०० दशलक्ष लिटरने कमी आहे. त्यासाठी उपलब्ध पाणीपुरवठ्यांमधून ३२ टक्के पाणी चोरी आणि गळती यापोटी वाया जाते. "अल निनो " या वादळाचा आणि अनियमित पावसाचा परिणाम पाहता राज्य शासनाने हवामान खात्याच्या सूचनेनुसार कमी पावसाचा आणि त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तलावात जमा होणाऱ्या पाणीसाठ्याचे पुढील १७ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल असे नियोजन करण्याचे निर्देश अगोदरच दिले आहेत. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा , विहार आणि तुळशी या सात तलावांमधून मुंबईला दररोज ४,१०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईला पावसाळा संपल्यावर म्हणजे १ ऑक्टोबर रोजी सात तलावांत मिळून एकूण १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता भासते.

सध्या २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत १४,१५,०७७ दशलक्ष लिटर (९७.७७ %) पाणीसाठा आणि दररोज होणारा पाणीपुरवठा याचे गणित केल्यास पुढील ३४५ दिवस पुरेल इतका म्हणजेच पुढील २४ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईला पुढील वर्षात पावसाळ्याचे अडीच महिने म्हणजेच १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत तरी पाण्याचे कसलेही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सात तलावातील जमा पाणीसाठा आणि दररोज होणारा पाणीपुरवठा यांचे गणित केल्यास पुढील ३२५ दिवस पुरेल म्हणजे पुढील ६ जुलै २०२७ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना पाणी टंचाईचे टेन्शन घेण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच, सात तलावांपैकी मोडक सागर, तानसा, तुळशी, विहार, मध्य वैतरणा हे पाच तलाव भरलेले आहेत. तर, भातसा तलाव भरण्याच्या मार्गावर असून एखाद जोरदार सारीमुळे अप्पर वैतरणा तलाव देखील पावसाळा संपेपर्यंत भरेल. अद्यापही सप्टेंबर महिन्याचे पावसाचे १० दिवस बाकी आहेत. तसेच, १५ ऑक्टोबर रोजीपर्यंत परतीचा पाऊस अधूनमधून पावसाच्या सरी बरसतातच. त्यामुळे पाण्याच्या समस्येने त्रस्त मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

सात तलावातील पाणीसाठ्याबाबत २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतची माहिती -: ------------------------------------------------------ --- तलाव पाणीसाठा तलावातील पाणीसाठा द.लि टक्केवारी अप्पर वैतरणा -: २,१७,४०४ ९५.७५

मोडक सागर -: १,१२,००६ ८६.८८

तानसा - १,४३,०६३ ९८.६१

मध्या वैतरणा १,९३,६४१ १००.००

भातसा -: ७,१३,१९६ ९९.४६

विहार -: २७,६९८ १००.००

तुळशी -: ७,९६९ ९९.०५ -------------------------------------------------------- सन २०२६ -: १३,३४,९७९ (९७.७७%)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >