Friday, November 6, 2026

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत रक्तरंजित घटना, दोन बहि‍णींवर अंदाधुंद गोळीबार; गोळी एकीच्या कानाला तर दुसरीच्या...

Navi Mumbai Firing Case : नवी मुंबईतील कोपरखैरणेतील सेक्टर 1 मध्ये, प्रेमप्रकरणातून गोळीबार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपीने दोन बहिणींवर अंदाधुंद गोळीबार केला आहे.

नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 1 मध्ये दोन तरूणींवर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली आहे. घराबाहेर बसलेल्या दोन तरूणींवर झालेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. घटनेतील दोन्हीही तरूणी सख्ख्या बहिणी आहेत. घटनेतील, मोठी बहिण 22 वर्षांची आहे, तर दुसरी 20 वर्षीय आहे. गोळीबाराच्या घटनेमध्ये मोठ्या बहिणीच्या कानाला गोळी लागली आहे, तर छोट्या बहिणीच्या पाठीला गोळी लागली आहे. काही मिडिया रिपोर्टनुसार, प्रेम प्रकरणामुळे दोन्हीही बहि‍णींवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

परिसरातील गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्हीही जखमी मुलींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सुरुवातीला त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्हीही बहिणींची प्रकृती स्थिर आहे. काही मिडिया रिपोर्टनुसार, गोळीबाराची घटना प्रेमप्रकरणातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपी 20 वर्षीय तरूणीचा एक्स बॉयफ्रेंड असल्याची माहिती आहे. त्या तरूणीने बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केल्यामुळे तो युवक नाराज होता. हाच डोक्यात राग ठेवत त्या तरूणाने दोन्हीही बहि‍णींवर अंदाधुंद गोळीबार केल्याचे बोलले जात आहे.

गुरूवारी, 5 नोव्हेंबर 2026 रोजी सेक्टर 1 मध्ये घराच्या बाहेर रात्री उशिरा दोन्हीही बहिणी बसलेल्या होत्या. घराच्या बाहेर असलेल्या अंगणामध्ये बसलेल्या असताना छोट्या तरूणीच्या एक्स बॉयफ्रेंडने अंदाधुंद गोळीबार केला आहे. आरोपीची ओळख पटली असून त्याचं नाव अर्जुन चव्हाण (22) असं आहे. मुख्य आरोपी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून त्याचा साथीदार अद्यापही फरार आहे. आरोपीच्या साथीदाराचे नाव, राकेश चव्हाण असं आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. DCP (Zone 1) विजय खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपी अर्जुन चव्हाणचे जखमी असलेल्या दोन्हीही बहि‍णींपैकी एका बहिणीचा एक्स बॉयफ्रेंड आहे. त्या दोघांचेही पूर्वी प्रेमसंबंध होते. ब्रेकअप झाल्याच्या रागामध्ये आरोपीने हा गुन्हा केला आहे. आरोपीची बंदूक आणि आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे."

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >