वाहन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी शहरातील गरीब व गरजू नागरिकांचा शोध घेऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्वाची कागदपत्रे म्हणजेच आधारकार्ड पॅनकार्ड या कागदपत्रांची मागणी करून तर काहींना कागदपत्रांच्या मोबदल्यात पाच हजार रुपये अथवा सहा महिन्यांनी दुचाकी देण्याचे आमिष दाखवून नागरिकांच्या कागदपत्रांची फसवणूक करून त्यावर बँक व फायनान्स कंपन्यानंकडून कर्ज घेत दुचाकी काढून त्या परस्पर ५० ते ६० टक्के कमी किमतीला विक्री करणाऱ्या टोळीचा भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून यामध्ये तब्बल ३२ लाख रुपयांच्या ३३ दुचाकी जप्त करीत चार जणांच्या टोळीला अटक करण्यात यश मिळविले आहे अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली आहे.

या प्रकरणी शाह मोहम्मद आसिफ मोहम्मद आझम ऊर्फ बावटा यास ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने शहरातील वेगवेगळ्या दुचाकीच्या शोरूममधून कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करीत अनेक दुचाकी ५० टक्के कमी किमतीत विक्री केल्याचे आढळले. त्याचे साथीदार अल्ताफ लतीफ शेख, शफिक अब्दुल लतीफ अन्सारी, अरबाज आसिफ मोमीन उर्फ देवा या चार जणांच्या मुसक्या आवळत त्यांच्या ताब्यातून तब्बल ३३ दुचाकी ६ मोबाईल असा एकूण ३२ लाख ३६ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Comments
Add Comment

iPhone 18 Pro : iPhone 18 Pro ची भारतात विक्री सुरू! खरेदीसाठी दिल्ली, मुंबई, बेंगळूरमध्ये रात्रीपासूनच ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांचा रांगा

मुंबई : ॲपलच्या नव्या iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची विक्री सुरू होण्यापूर्वीच ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणावर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; आदित्य ठाकरेंच्या बचावासाठी म्हणाले...

सीबीआयच्या नव्या FIR नंतर प्रकरण पुन्हा चर्चेत मुंबई : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाने

Mumbai Banganga Aarti : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त मलबार हिलच्या ऐतिहासिक बाणगंगा येथे महाआरती संपन्न; मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई :

Mumbai News: नवीन वर्षात राणीबागेत घुमटाकार मत्स्यालयाचे होणार लोकार्पण, कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात नव्याने उभारण्यात

Sion station update : शीव येथील रेल्वेचा पूल नोव्हेंबरपासून सेवेत? येत्या १५ऑक्टोबरपर्यंत सर्व कामे पूर्ण केली जाणार; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रकल्पस्थळाची केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) रेल्‍वे स्थानकाजवळील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम

Mumbai News: भायखळा ते जे.जे मार्ग मे २०२८ पर्यंत होणार सुकर, निर्धारीत वेळेपूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरातील दळणवळणाची व्‍यवस्‍था अखंड आणि एकीकृत करण्‍याच्‍या उद्देशाने मुंबई