Naresh Mhasake : 'ब्रिटिश, मुघल प्रतिकांपासून देशाला मुक्त करावे'

ठाणे : भारतीय संस्कृतीशी काही देणेघेणे नसलेल्या, पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या मुघल आणि ब्रिटिशांच्या वारशांचे आपण गेली ७५ वर्ष `ऐतिहासिक' या गोंडस नावाखाली जतन करत आलो आहोत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या संरक्षणाखाली ३,६९१ स्मारके आहेत. परंतु यापैकी २५ टक्के स्मारकांना कोणतेही राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक महत्त्व नसल्याची धक्कादायक माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. भारतीय वारशांचे अधिक प्रमाणात जतन करण्यासाठी ब्रिटिश आणि मुघल प्रतिकांपासून देशाला मुक्त करावे तसेच क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर नष्ट करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत लावून धरली.



स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपण ऐतिहासिक वारशांचे रक्षण करण्याच्या नावाखाली वसाहतवादी भूतकाळाचे ओझे वाहून नेत आहोत. या संरक्षित स्मारकांमध्ये ब्रिटीश सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या ७५ कबरी आहे. ज्यांचा भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीशी काहीही संबंध नाही. भारताला गुलाम बनविणाऱ्यांच्या आठवणी आपण आपला वारसा म्हणून जपतो आहोत हे योग्य आहे का? असा सवाल करत आपल्या स्वाभिमानाचा आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचा आपण अवमान करत असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. औरंगजेब रोड, बाबर रोड सारखी नावे आपल्याला भारताच्या गुलामगिरीची आठवण करून देतात, ती त्वरित बदलून भारताच्या वीरांच्या नावावर ठेवली पाहिजेत, तसेच मुलांना महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, गुरु गोविंद सिंग यांच्या शौर्याच्या गाथा सांगितल्या पाहिजेत. त्यासाठी ठोस पावले उचलण्याची विनंती खा. नरेश म्हस्के यांनी संसदेत केली.

Comments
Add Comment

Health Benefits of Bajra: थंडीत बाजरी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Health Benefits of Bajra: अलीकडेच मुंबईसह राज्यात थंडी पडायला सुरुवात झाले. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आहारात अनेक बदल केले

शहराच्या झगमगाटापासून दूर... शहापुरात उलगडणार ताऱ्यांचे विश्व; महाराष्ट्रातील नवे डार्क स्काय झोन

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे उभारण्यात आलेले पहिले अत्याधुनिक आणि हाय-टेक 'सॅपो' (SAPO) तारांगण सध्या संपूर्ण

वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, न्युझीलंड विरुद्धची मालिका जिंकूनही 'या' चुकांवर दुर्लक्ष केलं तर...

मुंबई: न्युझीलंडमधील बे ओव्हल या होम ग्राऊंडमध्ये आज, न्युझीलंड विरुद्ध भारत हा सामना रंगला. ह्या शेवटच्या

Fire News: पनवेलच्या स्टील मार्केटमध्ये भीषण आग! थिनरच्या ड्रमचा मोठा स्फोट, अग्निशमन जवान जखमी

Panvel Fire News: नवी मुंबईमधील पनवेल परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कळंबोली येथील स्टील मार्केटमधील एका गॅरेज आणि

Samruddhi Mahamarg : 120 वेगमर्यादेच्या समृद्धी महामार्गावर गुरांचा कळप! वाहनचालकांचा थरकाप, मोठा अनर्थ टळला

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील समुद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ नुकताच २ दिवसापूर्वी भीषण

केंद्र सरकारकडून आदिवासी बांधवांवर योजनांचा पाऊस, 'या' गोष्टींमुळे समाजाचे पालटणार जीवन

मुंबई: भारतात आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या संस्कृतीच्या जतनासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक