अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ‘भिडेवाडा’ रुपेरी पडद्यावर

पुणे : ऐतिहासिक वैभवाने नटलेल्या महाराष्ट्रातील वाड्यांमध्ये ‘भिडेवाडा’ हे नाव विशेष मानाने घेतले जाते. कारण ही वास्तू केवळ दगड–मातीची रचना नसून, ती आहे एका क्रांतीची साक्ष. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी येथेच देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. त्यामुळे ‘भिडेवाडा’ ही केवळ वास्तू न राहता, स्त्री शिक्षणाच्या ऐतिहासिक संघर्षाची आणि परिवर्तनाची साक्षीदार ठरली आहे. हाच ऐतिहासिक ‘भिडेवाडा’ आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या वास्तूच्या प्रेरणादायी वारशातून जन्मलेली एका तरुणीच्या जिद्दीचा, स्वप्नांचा आणि संघर्षाचा प्रवास ‘भिडेवाडा’ या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे. भूतकाळाच्या प्रेरणेतून वर्तमानाशी नाळ जोडणारी ही कथा समाजमनाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.


शिवमुद्रा स्टुडिओज निर्मित आणि राघो फिल्म प्रस्तुत ‘भिडेवाडा’ या सामाजिक चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवानी राजेशिर्के आणि अजित शिरोळे यांनी केले असून, निर्मितीची जबाबदारी जयश्री शिरोळे आणि कावेरी जावळे यांनी सांभाळली आहे. तर सुप्रिया शिंदे, वैभव जोशी आणि राजू विटकर हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.


या चित्रपटात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तर महात्मा जोतिराव फुले यांची भूमिका धीरेश जोशी साकारली आहे. या दोघांसोबत या चित्रपटात माधव अभ्यंकर, वैभव चव्हाण, ऋतुराज वानखेडे, नेहा सोनावणे, सम्राट शिरोळे, शरा गायकवाड, प्रदीप कोथमीरे, आनंद पिंपळकर, समद खान, प्रतिभा भगत, श्रीराम पेंडसे, निखिल निगडे, योगेश तनपुरे, पंकज चव्हाण व अनिरुद्ध देशपांडे हे कलाकार आहेत.


कथा अजित शिरोळे यांची असून पटकथा अजित शिरोळे अक्षय कट्टी यांची आहे. संवाद अक्षय कट्टी यांनी लिहिले आहेत गीते ईश्वर अंधारे यांनी लिहिली असून संगीत सागर शिंदे यांनी दिले आहे. संकलन राजेश बारबोले तर छायांकन योगेश कोळी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेश गोरे तर ध्वनी अशोक झुरुंगे यांचे आहे. कार्यकारी निर्माते अमित माझीरे आहेत. इतिहासाची साक्ष आणि वर्तमानाचा संघर्ष यांची सांगड घालणारा ‘भिडेवाडा’ हा चित्रपट सामाजिक जाणिवांना स्पर्श करणारा महत्त्वपूर्ण सिनेअनुभव ठरणार आहे.

Comments
Add Comment

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या