ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यावर २२ अल्पवयीन विद्यार्थिनींनी विनयभंगाचा आरोप केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याला अटक केली आहे. गणपत गवळी असे आरोपीचे नाव आहे. तो शहापूर तालुक्यातील टेंभे येथील आदिवासी आश्रमशाळेत काम करत होता.
ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २८ ...
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता सहावी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी गणपत गवळीविरोधात गंभीर आरोप केले आहेत. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण झाल्यानंतर विद्यार्थीनी आपली ताटे आणि इतर भांडी ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात जात असत. त्यावेळी आरोपी त्यांना वारंवार अयोग्य पद्धतीने स्पर्श करत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर विद्यार्थिनींनी या प्रकाराची माहिती दिल्यानंतर प्रकरण समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपी गणपत गवळीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा प्रशासनाकडूनही आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.





