Nashik : नाशिकमध्ये रेशनकार्डची मोठी पडताळणी, २९ हजार ७७३ कार्डे वगळली

Nashik : नाशिक जिल्ह्यात रेशनकार्डची पडताळणी आणि लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील तब्बल २९ हजार ७७३ रेशनकार्डधारक यादीतून वगळण्यात आले आहेत. तर दुसरीकडे २५ हजार ७५३ नवीन रेशनकार्डधारकांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे रेशन व्यवस्थेतील अपात्र आणि दुबार नोंदी कमी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे स्पष्ट होत आहे.



२९ हजार ७७३ कार्डे वगळली


प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पडताळणीत सर्वाधिक रेशनकार्डे ही प्राधान्य कुटुंब गटातील आहेत. या गटातील तब्बल १८ हजार ५२७ कार्डे यादीतून कमी करण्यात आली आहेत. त्यानंतर अंत्योदय योजनेतील ५ हजार ५०२, बिगरप्राधान्य गटातील ३ हजार ४४२ आणि दारिद्र्यरेषेवरील २ हजार ३०२ रेशनकार्डे वगळण्यात आली आहेत. दरम्यान, एकीकडे अपात्र आणि दुबार लाभार्थ्यांची नावे कमी करण्यात येत असतानाच दुसरीकडे पात्र नवीन लाभार्थ्यांना रेशन व्यवस्थेत समाविष्ट करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. नव्याने रेशनकार्ड देण्याच्या प्रक्रियेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


नवीन लाभार्थ्यांच्या नोंदीमध्ये प्राधान्य कुटुंब गटातील १९ हजार ३९ लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर अंत्योदय योजनेतील ४ हजार ५३५, बिगरप्राधान्य गटातील १ हजार ७५८ आणि दारिद्र्यरेषेवरील ४२१ लाभार्थ्यांची नव्याने नोंद करण्यात आली आहे. मे २०२६ ते १६ ऑगस्ट २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात १६ हजार ४०५ नवीन रेशनकार्डे तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे रेशनकार्डधारकांच्या नोंदी अद्ययावत करण्यासोबतच पात्र नवीन लाभार्थ्यांना व्यवस्थेत सामावून घेण्याची प्रक्रिया देखील वेगाने सुरू असल्याचे दिसून येते.



नावे वगळण्यामागची कारणे काय ?


प्रशासनाच्या पडताळणीदरम्यान काही लाभार्थी मयत झाल्याचे आढळून आले. काही ठिकाणी एकाच लाभार्थ्याची दुबार नोंद होती. तर काही लाभार्थी कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचेही समोर आले. याशिवाय काही जण पात्रता निकष पूर्ण करत नसल्याचे पडताळणीत आढळून आल्याने त्यांची नावे यादीतून कमी करण्यात आली आहेत. यामध्ये लग्न झालेल्या मुलींची नावे त्यांच्या जुन्या कुटुंबाच्या रेशनकार्डमधून कमी करणे, तसेच मयत झालेल्या नागरिकांची नावे वगळणे याचाही समावेश आहे. अशा प्रकारे प्रत्यक्षात पात्र नसलेल्या लाभार्थ्यांची नावे कमी करून त्या जागी पात्र नवीन लाभार्थ्यांना रेशन व्यवस्थेत समाविष्ट केले जात आहे. यामुळे रेशनच्या योजनांचा लाभ खऱ्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. तसेच रेशनकार्डच्या नोंदी अधिक अचूक आणि अद्ययावत ठेवण्यास प्रशासनाला मदत मिळणार आहे.



२५ हजार ७५३ नवीन लाभार्थ्यांची नोंद


विशेष म्हणजे, ही पडताळणी मोहीम केवळ काही महिन्यांपुरती मर्यादित नसून ती कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे नाशिकचे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी सांगितले आहे. त्यामुळे भविष्यातही मयत, दुबार, स्थलांतरित किंवा अपात्र लाभार्थ्यांच्या नोंदी तपासून त्या अद्ययावत केल्या जाणार आहेत. एकूणच, नाशिक जिल्ह्यात रेशनकार्डची पडताळणी मोहीम आता अधिक व्यापक झाली आहे. एका बाजूला २९ हजार ७७३ रेशनकार्डे यादीतून वगळण्यात आली असताना दुसऱ्या बाजूला २५ हजार ७५३ नवीन लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना शासकीय अन्नधान्य योजनांचा लाभ मिळावा आणि अपात्र किंवा दुबार नोंदींमुळे होणारा गैरप्रकार रोखला जावा, यासाठी प्रशासनाकडून सातत्याने ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Comments
Add Comment

स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पहिला मालिका विजय, झिम्बाब्वेला नऊ विकेट्सने केलं पराभूत

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग 2 सामन्यांत भारताने विजय

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

Amrit Bharat Express: मुंबई ते अयोध्या 11 जनरल डब्यांसह अमृत भारत एक्स्प्रेस… महाराष्ट्रात कुठे कुठे असेल थांबा?

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा या सणानिमित्त मुंबईहून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जात असतात. दरवर्षीची

DCM Eknath Shinde: सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी शाळा आणि शिक्षकांसाठी

FDA Action: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही FDA ची धडक कारवाई, रिलायन्स स्टोरेज आणि ब्लिंकिटच्या कोल्ड स्टोरेजवर धाड सत्र

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह इतरत्र जिल्ह्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत लाखोंचा

Deputy Chief Minister Eknath Shinde: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा ‘डॅमेज कंट्रोल’; सरनाईकांसाठी बंडखोरी शमवली

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराला