रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी गावाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गालगत असलेल्या सुमारे २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, मागे बसलेली तरुणी गंभीर जखमी झाली आहे.(Mumbai Goa Highway Accident)
बारामती : बारामती तालुक्यातील पणदरे गावात ३० वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैशाली तानाजी पवार (वय ३०, रा. ...
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश निवृत्ती पाटे (वय २९, रा. पोलादपूर) आणि अक्षता अरविंद कवडे (वय २८, रा. चिपळूण) हे दोघे दुचाकीवरून पोलादपूरहून चिपळूणच्या दिशेने निघाले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते चिपळूणकडे प्रवास करत होते. खवटी गावाजवळील दत्त मंदिर परिसरात आल्यानंतर दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट महामार्गाच्या कडेला असलेल्या खोल दरीत जाऊन कोसळली. अपघाताची तीव्रता एवढी होती की दुचाकीस्वार सतीश पाटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अक्षता कवडे या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.(Mumbai Goa Highway Accident)
रियाद: मध्य-पूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक स्फोटक आणि गंभीर होत चालली आहे. इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, आता ...
यानंतर जखमी तरुणीला उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे. मृत दुचाकीस्वारालाही रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक कोकणाकडे रवाना होत आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली असून अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाल्याचेही वृत्त आहे.(Mumbai Goa Highway Accident)
अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. दोघांचे काही नवे व्हिडीओ सध्या सोशल ...
दरम्यान, या अपघातामुळे पोलादपूर आणि चिपळूण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सणाच्या काळात महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून, विशेषतः वळणाच्या आणि घाट परिसरात अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या अपघाताचा पुढील तपास संबंधित पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अधिकृत तपासातून माहिती समोर येणे अपेक्षित आहे.