Salman Khan paparazzi : ‘बिग बॉस २०’च्या मंचावर सलमान खानचा पापाराझींवर संताप; अभिनेत्रींच्या खासगीपणाच्या मुद्द्यावर खडा सवाल

मुंबई : ‘बिग बॉस २०’च्या नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’ भागात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने पापाराझींच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. महिला कलाकारांचे मागून आक्षेपार्ह फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या आणि त्यावर ‘कोण?’ अशा स्वरूपाची कॅप्शन टाकण्याच्या प्रकारावर त्याने कडाडून टीका केली. महिलांच्या खासगीपणाचा (Privacy) आदर राखला गेला पाहिजे, असे स्पष्ट करत सलमानने अभिनेत्रींना याविरोधात एकत्र येऊन आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.(Salman Khan angry on paparazzi)



सई मांजरेकर आणि भाचीच्या उदाहरणावरून संताप


कार्यक्रमादरम्यान बोलताना सलमान म्हणाला की, अनेक अभिनेत्री अशा प्रकारे अचानक काढल्या जाणाऱ्या फोटोंमुळे कमालीच्या अस्वस्थ होतात. अभिनेत्री सई मांजरेकरचे उदाहरण देताना, तिला नुकतेच अशाच एका परिस्थितीत अस्वस्थ झाल्याचे आपण पाहिल्याचे त्याने सांगितले. याशिवाय, अभिनेत्री नेहा धुपियानेही यापूर्वी अशा प्रकारच्या वर्तनाविरोधात उघडपणे आवाज उठवला असल्याचे त्याने नमूद केले.(Salman Khan angry on paparazzi)


स्वतःच्या कुटुंबाचा अनुभव सांगताना सलमानने त्याच्या भाचीचा किस्साही शेअर केला. त्याची भाची बाहेर जात असताना काही लोकांनी तिचे मागून वारंवार फोटो काढले आणि ‘ओळखा पाहू कोण?’ अशा कॅप्शनसह ते सोशल मीडियावर शेअर केले. या विकृत मानसिकतेवर प्रश्न उपस्थित करत सलमानने अशा लोकांची ओळख समोर आल्यास त्यांना थेट जाब विचारण्याची आपली इच्छा असल्याचे म्हटले.



महिलांच्या सन्मानाचा मुद्दा


सलमानने पुढे असेही सांगितले की, तो ज्या बहुतांश महिला कलाकारांना वैयक्तिकरित्या ओळखतो, त्यापैकी अनेक आता आई झाल्या आहेत आणि त्यांना स्वतःच्या व कुटुंबाच्या बाबतीत अशी छळवणूक अजिबात आवडत नाही. कोणत्याही महिलेच्या संमतीशिवाय तिचे अशा प्रकारे फोटो टिपणे आणि ते सोशल मीडियावर पसरवणे अत्यंत चुकीचे असल्याचे त्याने ठणकावून सांगितले.(Salman Khan angry on paparazzi)


सलमान खानच्या या परखड भूमिकेनंतर आता सोशल मीडियावर महिला कलाकारांच्या सुरक्षेचा अधिकार, खासगीपणा आणि पापाराझींच्या हद्दी याविषयी पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

'बिग बॉस ७' फेम सोफिया हयात भाईजानवर भडकली; म्हणाली, "सलमान खान एक नंबरचा ढोंगी आणि..."

मुंबई: 'बिग बॉस २०'चा शनिवारी रात्री 'विकेंड का वार' चा एपिसोड टेलिकास्ट झाला. हा एपिसोड सध्या सोशल मीडियावर

Madhuri Dixit : पैठणी, नथ अन् 'धकधक गर्ल'चा मराठमोळा अंदाज; 'कोण होणार करोडपती?'ची तारीख अखेर ठरली!

मुंबई : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता छोट्या पडद्यावर एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. महाराष्ट्रातील

Katrina Kaif Trolling : कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खान संतापला; ‘बिग बॉस 20’मध्ये ऑन कॅमेरा शर्ट काढून...

मुंबई : कतरिना कैफ नुकतीच पती विक्की कौशलसोबत गणपती उत्सवात सहभागी झाली होती. त्यावेळी तिच्या वाढलेल्या

Rohed Khan Bigg Boss 20 : पहिल्याच आठवड्यात 'रोहेद खान'चा पत्ता कट; ‘बिग बॉस २०’मध्ये पहिलं एलिमिनेशन

मुंबई : ‘बिग बॉस २०’चा नवा सीझन सुरू झाल्यापासून घरातील स्पर्धकांमध्ये वाद, भांडणं आणि मनोरंजनाची रंगत पाहायला

Ranveer- Deepika 2nd Baby Girl: रणवीर- दीपिकाच्या घरी पुन्हा गौराईचं आगमन, बॉलिवूड कपल दुसऱ्यांदा झाले आई- बाबा

मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह दुसऱ्यांदा आई- बाबा झाले आहेत. दीपिकाने एका

Bhootam Bhayam : ‘ऑरेंज ज्युस गँग’ची पहिली फिल्म आता घरबसल्या; ‘भूतम् भयम्’ २५ सप्टेंबरपासून OTTवर रिलीज

मुंबई : सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेल्या ‘ऑरेंज ज्युस गँग’ची पहिलीच फिल्म ‘भूतम् भयम्’ आता OTTवर दाखल होण्यासाठी