Saturday, September 26, 2026

Mumbai Ganpati Visarjan: मुंबईकरांनी साश्रूनयनांनी लाडक्या बाप्पाला दिला निरोप, विसर्जनाच्या दिवशी 35,000 हून अधिक मूर्तीचे विसर्जन

Mumbai Ganpati Visarjan: मुंबईकरांनी साश्रूनयनांनी लाडक्या बाप्पाला दिला निरोप, विसर्जनाच्या दिवशी 35,000 हून अधिक मूर्तीचे विसर्जन
मुंबई: साश्रूनयनांनी काल लाडक्या बाप्पााला निरोप देण्यात आला. मुंबईमध्ये अनेक मानाच्या गणपतींसह इतरत्र सार्वजनिक मंडळांचे आणि घरगुती बाप्पांना निरोप देण्यात आला. मुंबईमध्ये आज (26 सप्टेंबर शनिवार) सायंकाळी 6 वाजेपर्यंत 36268 इतक्या गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. विसर्जनाच्या दिवशी अवघी मुंबई "गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या जयघोषाने दुमदुमुन निघाली होती. 12 व्या दिवशी अर्थात अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाखो मुंबईकरांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. ढोल ताशाच्या गजरामध्ये मुंबईकरांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 26 सप्टेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 36268 एकूण गणपती मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील 7051 गणेश मुर्तींचे, 28657 घरगुती गणेश मुर्तींचे आणि 560 गौरीच्या मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकींमध्ये मुंबईसह उपनगरांमधून लाखो भाविक सहभागी झाले होते. परंतू कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त समोर आले नाही. ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी अनेक ठिकाणी विसर्जनाच्या वेळी मुंबईकरांनी यंदा डीजेचा वापर न करता ढोल ताशांचा वापर केला होता. अवघे मुंबईकर ढोल ताशांच्या गजरामध्ये दंग झाले होते.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळपासूनच मुंबईतील अनेक मानांच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकींना सुरूवात झाली होती. अनेक तासांची ही मिरवणूक पार पडल्यानंतर सायंकाळपासून मानाच्या गणपतींचे विसर्जन होण्यासाठी सुरूवात झाली होती. मुंबईमध्ये कृत्रिम तलावासह, नैसर्गिक तलाव आणि चौपाटींवर अनेक ठिकाणी गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. सहा फुटांपुढच्या गणेश मुर्त्यांना चौपाटीवर गणेश मुर्ती विसर्जन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. बीएमसीकडून अनेक वॉर्डांमध्ये मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. ठरवून दिलेल्या ठिकाणांवर मुंबईकरांना आनंदात आणि जल्लोषात "पुढच्या वर्षी लवकर या" असं म्हणत लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >