Asian Games 2026 : आशियाई खेळात भारताचा डंका! ईशा सिंगचं रौप्य, लव्हलिनाचं पदक निश्चित तर भारतीय क्रिकेट संघ सेमीफायनलमध्ये!

आशियाई खेळांच्या १० व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांची कमाई सुरूच ठेवली आहे. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या २१ वर्षीय ईशा सिंगने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. सुवर्णपदकासाठी झालेल्या अत्यंत रोमांचक 'शूट-ऑफ'मध्ये ईशाचे यश थोडक्यात निसटले. याआधी दिवसाची सुरुवात कुराश खेळातून झाली, जिथे पिंकी भालाराने भारताला दिवसाचे पहिले कांस्य पदक मिळवून दिले. दुसरीकडे, महिलांच्या ७५ किलो वजनी गटात बॉक्सिंगच्या उपांत्य फेरीत धडक मारत स्टार बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनने आणखी एक पदक पक्के केले आहे.


मात्र, १० व्या दिवसाची सुरुवात भारतासाठी काहीशी निराशाजनक झाली. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकून इतिहास रचणाऱ्या मनू भाकरला २५ मीटर पिस्तूलच्या वैयक्तिक अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. याशिवाय, २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारातही भारतीय संघ पाचव्या स्थानावर राहिल्याने पदकापासून वंचित राहावे लागले. भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी १० वा दिवस सुदैवाचा ठरला. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारतीय संघाने थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला उत्कृष्ट 'आयसीसी रँकिंग'चा (ICC Ranking) फायदा मिळाला आणि संघ पुढे गेला.






आशियाई खेळ दिवस १० : भारताचे खेळानिहाय निकाल


बॉक्सिंग (Boxing) :


महिलांच्या ७५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत लव्हलिना बोरगोहेनने दक्षिण कोरियाच्या सेॉन्ग सुयॉनचा पराभव करून भारताचे पदक निश्चित केले.


कुराश (Kurash) :


महिलांच्या -७८ किलो उपांत्यपूर्व फेरीत पिंकी भालाराने लिम गाराम (दक्षिण कोरिया) हिचा पराभव केला.


उपांत्य फेरीत पिंकी भालाराला दक्षिण कोरियाच्या मो सुमीनकडून पराभव पत्करावा लागल्याने तिने कांस्य पदक (Bronze) पटकावले.


क्रिकेट (Cricket):


अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारतीय पुरुष संघ उपांत्य फेरीत (Semi-finals) दाखल झाला.


अर्चरी / तिरंदाजी (Archery) :


महिला कम्पाउंड वैयक्तिक 'राउंड ऑफ १६' मध्ये चिकीथा तानिपार्थीने चेन यी-हुआन (चिनी तैपेई) हिला पराभूत केले.


ज्योती सुरेखा वेन्नमला महिला कम्पाउंड 'राउंड ऑफ १६' मध्ये कांग यॉन्सिओ (दक्षिण कोरिया) कडून पराभव पत्करावा लागला.


पुरुषांच्या कम्पाउंड वैयक्तिक 'राउंड ऑफ १६' मध्ये तिरुमुरु गणेश मणी रत्नमने साहिल जाधवचा पराभव केला.


याआधी 'राउंड ऑफ ३२' मध्ये चिकीथाने दोरजी डोल्मा (भूतान) आणि ज्योती सुरेखाने अदेल झेक्सेनबिनोव्हा (कझाकिस्तान) यांचा पराभव केला होता.


व्हॉलीबॉल (Volleyball) :


पुरुषांच्या व्हॉलीबॉल गट सामन्यात भारताने हाँगकाँगचा ३-० असा एकतर्फी पराभव केला.


स्क्वॅश (Squash):


महिला सांघिक सामन्यात भारताने चीनचा २-१ असा पराभव केला.


पुरुष सांघिक सामन्यात भारताने चीनवर ३-० अशी मात केली.


शूटिंग / नेमबाजी (Shooting):


मनू भाकर, ईशा सिंग आणि राही सरनोबत यांचा समावेश असलेला भारतीय संघ २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात ५ व्या स्थानावर राहिला.


पुरुषांच्या ट्रॅप पात्रता फेरीच्या दुसऱ्या दिवसअखेर शपथ भारद्वाज ५ व्या, कीनान चेनाई १९ व्या, तर अहवार रिझवी ३२ व्या स्थानावर आहेत.


महिलांच्या ट्रॅप पात्रता फेरीत दुसऱ्या दिवसअखेर नीरू १ ल्या, मनीषा कीर २१ व्या, तर आशिमा अहलावत २३ व्या स्थानावर आहेत.


ईशा सिंगने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात रौप्य पदक (Silver) पटकावले.


सर्फिंग (Surfing):


पुरुषांच्या शॉर्टबोर्डच्या ३ ऱ्या फेरीत शिवराज बाबूला जयुआर्ड अल्किसो (फिलिपिन्स) कडून पराभव पत्करावा लागला.


किशोर कुमार अनबारसूने मा वेनसोंग (चीन) ला पराभूत करत पुढील फेरीत प्रवेश केला.


टेनिस (Tennis):


महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत अंकिता रैना आणि ऋतुजा भोसले या भारतीय जोडीला कझाकिस्तानच्या अण्णा दानिलिना आणि युलीय पुतिंतसेवा यांचूकडून पराभव स्वीकारावा लागला.

Comments
Add Comment

उत्तर प्रदेशातील मत्स्यपालनाला मिळणार जागतिक बळ; गोरखपूरमध्ये 'वर्ल्डफिश सेंटर'चे कार्यालय!

लखनौ: 'वर्ल्डफिश सेंटर' उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे मत्स्यपालन प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले. यावेळी

भारताची अमेरिकेला निर्यात 11 टक्क्यांनी वाढली; सहा महिन्यांत 50.80 अब्ज डॉलरची निर्यात

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारासाठी (BTA) वाटाघाटी सुरू असतानाच

Microsoft 365 ची सेवा पुन्हा रुळावर! Outlook सेवा पूर्ववत; जगभरातील युजर्सना मोठा दिलासा!

मुंबई: नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या 18 तासांपासून बंद असलेलं मायक्रोसॉफ्ट आऊटलूक (Microsoft Outlook)ची सेवा

Winter Destinations: हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय? भारतातील 'ही' ६ ठिकाणं आहेत पर्यटनासाठी परफेक्ट!

[caption id="attachment_1074920" align="alignnone" width="800"] 1.मनाली, हिमाचल प्रदेशबर्फाच्छादित पर्वत, सुंदर दऱ्या आणि थंड वातावरणासाठी मनाली

India first LED Dome Planetarium : म्हैसूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या 'एलईडी डोम' तारांगणाचे उद्घाटन!

म्हैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi)  यांनी शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) म्हैसूर विद्यापीठ परिसरात देशातील

National Sports Awards 2025: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका! विदित गुजराती, दिव्या देशमुख यांना अर्जुन पुरस्कार

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विदित संतोष गुजराती आणि दिव्या जितेंद्र देशमुख यांना