Asian Games 2026 : गुलवीर सिंगचा धावण्याच्या ट्रॅकवर जलवा! 1500 मीटरमध्ये रौप्यपदक; भारताच्या खात्यात आणखी एक पदक

नागोया (जपान) : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी सुरूच ठेवलीय. जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा स्टार धावपटू गुलवीर सिंग याने पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकून देशाच्या नावावर आणखी एका पदकाची नोंद केली आहे. अंतिम फेरीत त्याने 3:36.72 अशी स्वतःची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत हे यश मिळवले.



रोमांचक अंतिम सामना


12 खेळाडूंच्या या अंतिम शर्यतीत गुलवीर सुरुवातीपासूनच शर्यतीत टिकून राहिला आणि शेवटच्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारत त्याने आपले पदक निश्चित केले. जपानच्या काझुतो इझावा याने 3:36.35 अशी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. गुलवीरने इझावाच्या 'गेम्स रेकॉर्ड' वेळेपेक्षा केवळ 0.37 सेकंद उशिरा रेस पूर्ण केली. तर जपानचाच नागिया मोरी (3:37.92) याने कांस्यपदक पटकावले. मोरीपेक्षा गुलवीर एका सेकंदापेक्षा जास्त फरकाने पुढे राहिला. या फायनलमध्ये आणखी एक भारतीय खेळाडू युनूस शाह 3:43.88 वेळेसह नवव्या स्थानावर राहिला.(Gulveer Singh Silver Medal)



ऐतिहासिक कामगिरी आणि दुसरे पदक


मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने याच प्रकारात कांस्यपदक जिंकले होते, त्यामुळे गुलवीरचे हे रौप्य पदक भारतासाठी मोठी सुधारणा दर्शवणारे ठरले आहे. विशेष म्हणजे, आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेतील गुलवीर सिंगचे हे दुसरे रौप्यपदक आहे. याआधी शुक्रवारी झालेल्या पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत 28:29.38 वेळ नोंदवत त्याने पहिले रौप्य पदक जिंकले होते. या 10,000 मीटर शर्यतीत बहरीनच्या बिरहानु बालेवने सुवर्णपदक पटकावले होते.


सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय मंचावर कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत गुलवीरने भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांत कोरले आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.(Gulveer Singh Silver Medal)

Comments
Add Comment

विराट कोहलीचा 60 शतकांचा विक्रम मोडणं खूपच कठीण! असं का ते जाणून घ्या

वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला वनडे सामना भारताने 8 गडी राखून जिंकला. या विजयात कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली

Asian Games 2026 : नीरज चोप्राच्या अनुपस्थितीतही भारताची चमकदार कामगिरी; यशवीर सिंगला रौप्य तर रोहित यादवला कांस्यपदक

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भारताचा

SA vs AUS: कसोटी मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा जखमी खेळाडूवर डाव, 3 वर्षानंतर हा गोलंदाज परतणार

दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला वनडे मालिकेत मात खावी लागली आहे. तीन सामन्यांची वनडे

WPL 2027 Retention: डिफेंडिंग चॅम्पियन RCB कडून धक्कादायक निर्णय; पाहा पाच संघांची संपूर्ण रिटेन-रिलीज यादी

वुमन्स प्रीमियर लीग 2027 हे स्पर्धेचं पाचवं पर्व आहे. या स्पर्धेसाठी पाचही फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. आतापर्यंत

मी एकतर पोलिसात तक्रार करू शकतो...! टीम इंडियाच्या खेळाडूच्या तीन बॅट मैदानातून चोरी!

भारतीय संघ सध्या एशियन्स गेम्स 2026 स्पर्धा आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे व्यस्त आहे. पण या दोन्ही संघात दीपक चहर

IND vs WI सामन्यासाठी इशान किशन आणि अभिषेक शर्माचा देशी जुगाड! जापानमध्ये असा पाहिला सामना Video

जापानच्या आयची नगोया येथे एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उपांत्य फेरी गाठली