Monday, September 28, 2026

Sonam Maskar : Asian Gamesमध्ये 'सोनम मस्कर'ची दमदार कामगिरी; 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताला रौप्यपदक

Sonam Maskar : Asian Gamesमध्ये 'सोनम मस्कर'ची दमदार कामगिरी; 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताला रौप्यपदक

कामगार क्रीडा भवनाच्या सोनम मस्करची आशियाई क्रीडा स्पर्धेत गरुडझेप

मुंबई : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सोनम मस्करने उल्लेखनीय कामगिरी करत भारताला रौप्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल संघ प्रकारात भारतीय संघाने रौप्यपदक पटकावले असून, या कामगिरीत सोनमचा मोलाचा वाटा आहे. (Sonam Maskar)

भारतीय संघाने या प्रकारात एकूण 1898.0 गुण मिळवले. त्यापैकी सोनमने वैयक्तिक 634.1 गुण मिळवत संघातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्यामुळे तिच्या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे. (Sonam Maskar)

सोनम मस्कर सध्या पश्चिम रेल्वेत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. तिचे वडील महानंद वितरक सहकारी पतसंस्थेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सोनमने दिल्ली आणि कोल्हापूरसह मुंबईतील कामगार क्रीडा भवनाच्या शूटिंग रेंजमध्ये सराव केला आहे. (Sonam Maskar)

मुंबईतील तसेच कामगार कुटुंबातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणाची सुविधा मिळावी आणि त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रासह देशाचे नाव उज्ज्वल करावे, या उद्देशाने मुंबई शहर जिल्हा नियोजन निधीतून या शूटिंग रेंजची उभारणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या रेंजचे व्यवस्थापन केले जाते.(Sonam Maskar)

सोनमच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, उपसचिव रोशनी कदम पाटील, कल्याण आयुक्त भास्कर मोरडे आणि उपकल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांनी सोनमसह भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. (Sonam Maskar)

कामगार क्रीडा भवनातून सरावाला सुरुवात केलेल्या सोनम मस्करने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या व्यासपीठावर रौप्यपदकाची कमाई करत मुंबई आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढवला आहे.(Sonam Maskar)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >