वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला वनडे सामना भारताने 8 गडी राखून जिंकला. या विजयात कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली यांचं योगदान महत्त्वाचं ठरलं. कारण या दोघांनी शतकी खेळी केल्याने विजय सोपा झाला. त्यात विराट कोहलीचं शतक खास ठरलं. विराट कोहलीने तिरुवनंतपुरम वनडे सामन्यात 88 चेंडूत नाबाद 139 धावांची खेळी केली. या शतकी खेळीसह त्याच्या नावावर अनेक विक्रम रचले गेला. यात एक विक्रम खूप मोठा आहे. या विक्रमाला भविष्यात गवसणी घालणं भल्याभल्या फलंदाजांना जमणार नाही, हे देखील तितकंच खरं आहे.त्याला कारणही तसंच आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 86वं शतक ठोकलं. त्यात 60 शतकं अशी आहेत की त्या सामन्यात भारताला विजय मिळाला आहे. अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे. या यादीत त्याच्या आसपासही कोणी नाही.
विराट कोहलीचं रेकॉर्डब्रेक विजयी शतक
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंग याने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 71 शतकं ठोकली आहेत. त्यात 55 शतकी कामगिरीमुळे संघाला विजय मिळाला आहे. तर 16 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. या बाबतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कमनशिबी आहे. त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर शतकांचं शतक ठोकलं आहे. पण त्यापैकी 53 सामन्यात विजय आणि 47 सामन्यात शतक ठोकूनही पराभव सहन करावा लागला आहे. दुसरीकडे, रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 51 शतकं ठोकली आहेत. त्यापैकी 42 सामन्यात टीम इंडियाला विजय मिळाला आहे. तर 9 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे इतर खेळाडूंच्या रोहित शर्माच्या शतकांची विजयी टक्केवारी चांगली आहे.
SA vs AUS: कसोटी मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा जखमी खेळाडूवर डाव, 3 वर्षानंतर हा गोलंदाज परतणार
दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला वनडे मालिकेत मात खावी लागली आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका दुसऱ्या सामन्यानंतर 0-2 ने गमावली आहे. ...
विराट कोहलीचा षटकारांचा विक्रम
विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटच्या एकाच डावात ठोकलेल्या सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा प्रामुख्याने तिरुवनंतपुरमच्या मैदानावर पाहायला मिळाला आहे. विराटने त्याच्या वनडे कारकिर्दीतील एका डावात सर्वाधिक 9 षटकार ठोकण्याचा नवा विक्रम 2026 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तिरुवनंतपुरम येथे खेळताना केला. यापूर्वी त्याचा सर्वोत्तम विक्रम याच मैदानावर 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध होता, जेव्हा त्याने 8 षटकार ठोकले होते. याशिवाय 2013 मध्ये जयपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2025 मध्ये रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने प्रत्येकी 7 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता.