'यंदा पावसाने दगा दिला'... एकनाथ शिंदेंच्या 'त्या' ट्विटने चिंता वाढली, जनतेला भावनिक आवाहन करत म्हणाले...

महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून आता रब्बी हंगामासमोरही संकट उभं राहिलं आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान गेल्याच आठवड्यात सरकारने राज्यात दुष्काळाची घोषणा केली आहे. राज्यातील जवळपास 75 टक्के भागामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसाअभावी राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अनेक भागांमध्ये पिकांचे नुकसान झाले असून उभ्या पिकांनी माना टाकल्याचं चित्र आहे. खरीप हंगामावर परिणाम झाल्यानंतर आता रब्बी हंगामासाठीही पुरेशा पाण्याची उपलब्धता हा मोठा प्रश्न बनला आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.



एकनाथ शिंदे काय म्हणाले ?


एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की यंदा पावसाने दगा दिला, निसर्गाचा प्रकोप झाला. पिके करपली. अनेक ठिकाणी उभ्या पिकांनी माना टाकल्या. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत. आपला अन्नदाता बळीराजा दुष्काळाच्या भीषण परिस्थितीशी दोन हात करत असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही आपल्या सर्वांची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे.


मी नेहमी सांगत आलो आहे की, "या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क आमच्या बळीराजाचा आहे!" आमचे महायुती सरकार आणि शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने व खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. सरकार म्हणून आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोतच, पण एक समाज म्हणूनही आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. शेतकरी चिंताक्रांत असताना आगामी काळातील धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव धुमधडाक्यात साजरे करणे योग्य ठरणार नाही. म्हणूनच, नवरात्रोत्सव आणि पुढील काळातील अन्य उत्सव, समारंभ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करूया. या सर्व कार्यक्रमांचा निधी दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी द्यावा, असे नम्र आवाहन मी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सामाजिक संस्थांना आणि राज्यातील जनतेला करतो.


अन्नदाता संकटात असताना त्याच्यासोबत आपण सर्वजण खंबीरपणे उभे राहिलो तर या नैसर्गिक संकटावर आपण नक्कीच मात करू, असा मला विश्वास आहे. यंदाच्या उत्सवाचा खर्च वाचवून जर आपण शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसू शकलो आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकलो, तर तीच आदिशक्ती जगदंबेची खरी सेवा ठरेल! असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.


 

265 तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना


दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 265 तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना राबवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना अन्नधान्याची उपलब्धता, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत किंवा माफी, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी या उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : जनजातीय क्षेत्राच्या विकासासाठी २५ हजार कोटींची तरतूद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सह्याद्री अतिथिगृहावर संसदीय संकुल विकास परियोजनेचे उद्घाटन मुंबई : संसदीय संकुल विकास परियोजनेअंतर्गत तयार

Stay on loan recovery : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती

- पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश; ३० एप्रिल २०२७पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बँकांना सूचना   मुंबई :

Parth Pawar : ९९ टक्के भागीदारी असतानाही मुंढवा जमीनप्रकरणात पार्थ पवार आरोपी का नाहीत?

- उच्च न्यायालयाचा सवाल; पुढील तपासाचे डीजीपी करणार निरीक्षण मुंबई : पुण्यातील मुंढवा येथील ४० एकर सरकारी जमीन

'आधी स्वतःच्या मुलांना खायला द्या' पान मसाल्यांची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांवर FDA आयुक्तांचा संताप

अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) महाराष्ट्रभर कारवायांचा धडाका लावला आहे. दूधभेसळ, उपहारगृहात अस्वच्छता,

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; दोन सख्ख्या भावांसह मामाचा जागीच मृत्यू, टेम्पोचालक पसार

बीड : बीड–शिरूर–पाथर्डी मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, हिवरसिंगा परिसरात भरधाव टेम्पोने दुचाकीला

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला; आज कुठे पावसाची शक्यता? जाणून घ्या हवामान अपडेट

 Maharashtra Weather : महाराष्ट्रात परतीच्या मान्सूनला सुरुवात झाली असून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. 1