Saturday, October 3, 2026

Asian Games 2026: गोल्फ स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी, प्रणवीने गोल्ड मिळवून रचला इतिहास

Asian Games 2026: गोल्फ स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी, प्रणवीने गोल्ड मिळवून रचला इतिहास
एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा शेवटचा टप्पा सुरू असताना भारतीय स्पर्धकांनी मोठी झेप घेतली आहे. धडाधड गोल्ड मेडल मिळवून पदकतालिकेतील गुणांकन सुधारलं आहे. कुस्ती, तिरंदाजी, बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय स्पर्धकांना जबरदस्त कामगिरी केली. असं असताना एक अनपेक्षित गोल्ड भारताच्या पदरात पडलं आहे. खरं तर अशा भावना क्रीडाप्रेमींच्या आहेत. कारण भारताला गोल्फमध्ये सुवर्णपदक मिळेल असं क्रीडाप्रेमींच्या ध्यानीमनी नव्हतं. पण महिला गोल्फपटू प्रणवीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि भारताच्या पदरात गोल्ड मेडल टाकलं. प्रणवीच्या या कामगिरीचं भरभरून कौतुक होत आहे. कारण एशियन गेम्स स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल मिळवून देणारी ती पहिली महिला गोल्फपटू ठरली आहे. प्रणवीने एकूण 15 अंडर 265 स्कोअरसह सुवर्ण पदक पटकावलं. चीच्या यिन रुओनिंगने रौप्य, तर सिंगापुरच्या शैनन टनने कांस्य पदक नावावर केलं. या यशानंतर प्रणवीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिने आपल्या कामगिरीवर आनंद व्यक्त करत सांगितलं की, 'मला कोणतंही काम सर्वात आधी करणं पसंत आहे. लोकं पुढे जाऊन बरंच काही करतील, पण माझं नाव सर्वात पुढे असणार आहे.' दुसरीकडे, प्रणवीच्या या कामगिरीमुले भारतीय गोल्फ संघाला रौप्य पदकही आपल्या नावावर करता आला आहे. प्रणवीसह अदिती अशोक आणि दीक्षा डगर यांच्या कामगिरीने रौप्य पदक नावावर झालं आहे. सांघिक पदक गुणतालिकेतील दोन सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या आधारावर ठरवले जाते. या परिस्थितीत, भारताचा एकूण स्कोर 14-अंडर 546 होता. चीनने 22-अंडर 538 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. एशियन गेम्स स्पर्धेत भारताच्या पदरात गोल्फ प्रकारात 22 वर्षानंतर गोल्ड पदक आलं आहे. 2002 मध्ये शिव कपूरने पुरूषांच्या एकेरीत सुवर्ण पदक पटकावलं होतं. भारताचं हे गोल्फमधील पहिलं पदक होतं 1982 मध्ये एशियन गेम्सनंर भारताची सर्वोत्तम कामगिरी होती.

                            
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >