Sunday, October 4, 2026

Tree Cutting : सिध्दार्थ नगरमधील इमारत पुनर्विकासात ३७ झाडे बाधित

Tree Cutting : सिध्दार्थ नगरमधील इमारत पुनर्विकासात ३७ झाडे बाधित

तब्बल १७ कापणार, २० पुनर्रोपित करणार

या बदल्यात ६८७ झाडे लावली जाणार आहे,

या झाडांचे रोपण प्रकल्पाच्या ठिकाणी तसेच अंधेरी ओशिवरा येथील क्लबच्या जागेवर करणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगरमधील नियोजित इमारतींच्या ३७ झाडे बाधित होत असून त्यातील १७ झाडे कापावी लागणार आहे. तर २० झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. विशेष म्हणजे या झाडांच्या बदल्या ६८७ झाडे नव्याने लावली जाणार आहेत. ही सर्व झाडे मुंबईतच म्हणजे ओशिवरा भागांमध्ये लावली जाणार आहेत.

गोरेगाव पश्चिम येथील न्यू सिद्धार्थनगर एम आय जी कॉलनी वसाहतीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याठिकाणी पाहणीनुसार प्रत्यक्ष जागेवर एकूण ५८ झाडे अस्तित्वात आहेत. परंतु गृहनिर्माण प्रकल्पाच्या विकास आराखड्यानुसार व स्थळपाहणीनुसार या ५८ झाडांपैकी ३७ झाडे नियोजित इमारतीच्या बेसमेंटच्या बांधकामात व खोदकामात बाधित होत आहे. त्यामुळे ही झाडे काढण्यात येणार आहे. यातील १७ झाडे कापावी लागणार असून उर्वरीत २० झाडे ही पुनर्रोपित केली जाणार आहेत. या ३७ झाडांच्या बदल्यात ६८७ झाडे लावण्यात येणार आहे. या ६८७ झाडांपैकी ४८० झाडे ही या प्रकल्पाच्या ठिकाणीच लावली जाणार असून उर्वरीत २०७ झाडे ही अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा गाव येथील दि लिेंट रिक्रिएशन क्लबच्या जागेवर लावण्यात येणार आहे. या नव्याने लावण्यात येणाऱ्या झाडांचे सात वर्षांपर्यंतचे जतन संबंधित विकासकामार्फत केले जाईल अशाप्रकारचे हमी पत्र घेण्यात आले आहे.

उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या भरपाई वृक्षारोपण करतांना प्रजातींच्या वाढीसाठी लागणारी जागा, निकषानुसार झाडांमधील अंतर व भूखंडावर रस्त्यालगत लावण्यात येणा-या प्रजातींची निवड करतांना भविष्यात त्यापासून काही धोका होणार नाही याची खबरदारी अर्जदारामार्फत घेण्यात येईल.

भरपाई म्हणून नवीन लावल्या जाणाऱ्या झाडांच्या प्रजाती

बदाम, ताम्हण , बकुळ, बेलपत्र, आवळा, बहावा, अर्जुन, कदंब, कांचन, शिरिष, करंज, किंजल, बेहडा, पळस

नागकेशर, वड/उंबर/जांभूळ/पिंपळ ईत्यादी जागेच्या उपलब्धतेनूसार व निकषानुसार लावण्यात येतील असे उद्यान विभागाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >