स्मृती मंधानाचं नाव आधीही चर्चेत...
हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडल्यानंतर स्मृती मंधानाच्या नावाची चर्चा सुरू झाली असं अजिबात नाही. यापूर्वीही स्मृती मंधानाच्या नावाची चर्चा झाली आहे. स्मृती मंधाना भारतीय महिला संघाची धुरा सांभाळेल, असं आधीपासून बोललं जात होतं. 37 वर्षीय हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ विजयी पथावर जात होता. पण तिचा फॉर्म हा चिंतेचा विषय होता. त्यामुळेच तिच्या कर्णधारपदावर टांगती तलवार होती. असं असताना गुवाहाटीतील बीसीसीआय बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष लागून होतं. ही बैठकच मुळात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वावर निर्णय घेण्यासाठी होती, असं बोललं जात आहे. त्यामुळेच या बैठकीत प्रशिक्षक अमोल मुझूमदार, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना उपस्थित होते.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताने 2-1 विजय मिळवला असून आता टी20 मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. श्रेयस ...
भारतीय महिला संघाच्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या बैठकीत उपकर्णधार असण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी अंदाज बांधण्यास सुरूवात केली होती. स्मृती मंधाना त्या बैठकीत असल्याने भारतीय महिला संघाचं पुढचं नेतृत्व तिच्याच खांद्यावर असेल, असं बोललं जात आहे. आता स्मृती मंधाना हे नेतृत्व स्वीकारणार का? की वेगळं नाव समोर येणार? याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे.