IND vs WI: टीम इंडिया इंदूरमध्ये पलटवार करणार की विंडीज बाजी मारणार? रोहितचा विक्रम रडारवर!
रांचीमधील पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया इंदूरमध्ये सज्ज झाली आहे. धावांचा पाऊस पाडणाऱ्या होळकर स्टेडियमवर वेस्ट इंडिजचा संघ पहिल्यांदाच टी20 सामना खेळणार आहे. तुफान फॉर्मात असलेला विंडीजचा कर्णधार शाई होप या मैदानावर रोहित शर्माचा 118 धावांचा ऐतिहासिक विक्रम मोडीत काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
October 11, 2026 07:20 AM
IND vs WI: टीम इंडिया इंदूरमध्ये पलटवार करणार की विंडीज बाजी मारणार? रोहितचा विक्रम रडारवर! (Photo: ANI)
वेस्ट इंडिजने टी20 मालिकेत जोरदार कमबॅक केले आहे! पहिल्या सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर, दुसऱ्याच सामन्यात विंडीजने जोरदार पलटवार केला. भारताने तब्बल 249 धावांचा प्रचंड डोंगर उभा केला असतानाही, वेस्ट इंडिजने हा सामना जिंकून भारताला मोठा धक्का दिला. रांचीमध्ये विंडीजचा कर्णधार शाई होपने भारतीय संघाकडून विजय हिसकावून घेतला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता ही मालिका इंदूरमध्ये पोहोचली असून, रविवारी (11 ऑक्टोबर) तिसरा टी20 सामना खेळला जाणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा रोमांचक सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगणार आहे. तिसरा सामना एका संघाला मालिका विजयासाठी दोन संधी तर, दुसऱ्या संघाला करो या मरोच्या स्थितीत आणणारा आहे.
इंदुरमध्ये धावांचा पाऊस पडणार?
इंदूरमध्येही फलंदाजांची चांदी होण्याची दाट शक्यता आहे, कारण हे मैदान नेहमीच हाय-स्कोअरिंग राहिले आहे. 2017 मध्ये भारतीय संघाने येथे 260 धावा कुटल्या होत्या, जी या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या आहे. याच सामन्यात स्टार सलामीवीर रोहित शर्माने 12 चौकार आणि 10 षटकार ठोकत श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई केली होती आणि 118 धावांची स्फोटक खेळी केली होती. इंदूरच्या होळकर मैदानावर आतापर्यंत 4 टी20 सामने खेळले गेले आहेत, परंतु वेस्ट इंडिज संघ येथे पहिल्यांदाच या फॉरमॅटमध्ये मैदानात उतरेल. विंडीजने येथे एकमेव एकदिवसीय सामना 15 वर्षांपूर्वी, म्हणजेच 2011 मध्ये खेळला होता.
[caption id="attachment_1065364" align="aligncenter" width="800"] भारत वेस्ट इंडिज दुसरा टी20 सामना रांचीत सुरू आहे. या सामन्यात मोठी खेळी करण्यात अभिषेक शर्मा अपयशी ठरला. त्याचा खेळ फक्त 20 ...
रोहित शर्माचा या मैदानातील विक्रम कोण मोडणार?
इंदूरमध्ये रोहित शर्माचा हा महाविक्रम कोणी मोडू शकेल का? कारण याच मैदानात त्याने 118 धावांची स्फोटक फलंदाजी केली होती. भारताकडे अभिषेक शर्मा आणि इशान किशनसारखे फॉर्मात असलेले फलंदाज आहेत, तर संजू सॅमसननेही मागच्या सामन्यात आपली चुणूक दाखवली आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप भारतासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरला आहे. एकदिवसीय मालिकेतील सलग 2 शतके आणि टी20 मालिकेतील एक अर्धशतक व एक शतक झळकावून तो तुफान फॉर्मात आहे.