Nashik : नाशिकच्या वाहतूक कोंडीवर महापालिकेचा मास्टर प्लॅन ! 88 लाखांत चौकांचा होणार कायापालट

शहरातील चौकांचे आकारमान आणि वाहतुकीची तीव्रता लक्षात घेऊन त्यांचे लहान, मध्यम आणि मोठे असे वर्गीकरण केले जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक चौकाचे स्वतंत्र डिझाइन तयार केले जाईल. वाहतुकीचे विश्लेषण आणि मायक्रोसिम्युलेशनच्या माध्यमातून भविष्यातील वाहतुकीचा अंदाज घेतला जाणार आहे

नाशिक : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघात आणि वाहनचालकांचा वाया जाणारा वेळ कमी करण्यासाठी नाशिक महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील प्रमुख चौकांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करून त्यांचा विकास करण्यासाठी महापालिका आता 'जंक्शन इम्प्रूव्हमेंट प्लॅन' तयार करणार आहे. या आराखड्यासाठी तीन सल्लागार संस्थांची नियुक्ती करण्यात येणार असून, सुमारे ८८ लाख रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली.


नाशिक शहराचा विस्तार झपाट्याने होत असून, लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. धार्मिक आणि औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. यावेळी देशभरातून लाखो भाविक शहरात दाखल होतात. अशा परिस्थितीत शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.






सध्या शहरातील अनेक प्रमुख चौकांमध्ये अपुऱ्या नियोजनामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याचा परिणाम केवळ वाहनचालकांवरच नाही, तर पादचारी आणि सायकलस्वारांच्या सुरक्षिततेवरही होत आहे. त्यामुळे चौकांचे योग्य नियोजन करून वाहतूक सुरळीत करणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे, सिग्नल व्यवस्था सुधारणे, पार्किंगचे नियोजन करणे आणि अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट दूर करणे, या बाबींवर नव्या आराखड्यात भर दिला जाणार आहे.


या कामासाठी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये सात निविदा प्राप्त झाल्या, त्यापैकी पाच निविदा पात्र ठरल्या. त्यानंतर तीन सल्लागार संस्थांची नियुक्ती करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. यामध्ये ग्लोबल ट्रॅफिक सोल्युशन, अमेंड कन्सल्टंट आणि आशिक जैन (डिझाइन शाळा) या संस्थांचा समावेश आहे.






लहान, मध्यम आणि मोठ्या चौकांचे स्वतंत्र नियोजन


शहरातील चौकांचे आकारमान आणि वाहतुकीची तीव्रता लक्षात घेऊन त्यांचे लहान, मध्यम आणि मोठे असे वर्गीकरण केले जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक चौकाचे स्वतंत्र डिझाइन तयार केले जाईल. वाहतुकीचे विश्लेषण आणि मायक्रोसिम्युलेशनच्या माध्यमातून भविष्यातील वाहतुकीचा अंदाज घेतला जाणार आहे. प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वीच वाहतुकीच्या विविध परिस्थितींचा अभ्यास करून आवश्यक बदल सुचविणे यामुळे शक्य होणार आहे.


या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ८८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम आणि पादचारी जनजागृतीसाठी उपलब्ध असलेल्या निधीचा वापर केला जाणार आहे. एकूणच, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याच्या दृष्टीने हा आराखडा महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, या नियोजनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते आणि त्यातून शहरातील वाहतूक कोंडीला कितपत आळा बसतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

IND vs NZ 1st Test: केएल राहुल-यशस्वी जयस्वालचं न्यूझीलंडला जोरदार प्रत्युत्तर, 10 वर्षानंतर न्यूझीलंडने पाहिला असा दिवस

[caption id="attachment_1077112" align="aligncenter" width="800"] भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे.

IND vs NZ 1st Test: दुसऱ्या दिवसावर टीम इंडियाची पकड, दिवसअखेर 1 गडी बाद 159 धावा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना होत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने 6 गडी गमवून 243

Nashik News : नाशिकच्या पक्षी मानचिन्ह निवडीत गिधाडाची बाजी

नाशिक : नाशिक शहराच्या पक्षी मानचिन्ह निवडीचा निकाल महानगरपालिकेत जाहीर करण्यात आला. या निवड प्रक्रियेत

Nashik : दिवाळीत नाशिक एसटी विभागाची बंपर कमाई, 25.67 कोटींचा महसूल, उत्पन्नात 1.35 कोटींची वाढ

नाशिक : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणारे प्रवासी आणि पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याने एसटी

Baramati Airport : बारामती विमानतळाच्या विकासासाठी १३२ कोटींचा निधी मंजूर

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर चर्चेत आलेल्या बारामती विमानतळाच्या

Nashik Crime : चारित्र्यावर संशय, सततचा छळ अन् अखेर भयानक शेवट, नाशिकमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.