Tuesday, November 24, 2026

ऐतिहासिक द्विशतक! टी-20 क्रिकेटमध्ये 200 धावा करणारा वैभव सूर्यवंशी पहिलाच भारतीय

अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने क्रिकेटविश्वात ऐतिहासिक धमाका केला आहे. आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये UAE विरुद्ध खेळताना वैभवने अवघ्या 52 चेंडूत द्विशतक झळकावल्याचा दावा असून, सलग 2 षटकार मारत त्याने 200 धावांचा टप्पा गाठला. वरिष्ठ व्यावसायिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम त्याच्या नावावर झाल्याची चर्चा रंगली आहे.

क्रिकेटच्या मैदानावर आज इतिहास घडला आहे! अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेटविश्वाला थक्क करत अवघ्या 52 चेंडूत द्विशतक झळकावलं आहे. सलग 2 षटकार मारत वैभवने 200 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आणि आनंदात हात उंचावत या अविश्वसनीय पराक्रमाचा जल्लोष केला. वरिष्ठ व्यावसायिक क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान द्विशतक ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. वैभव सूर्यवंशीने आपल्या 200 धावांच्या कामगिरीत 28 षटकार आणि 7 चौकार मारले. वैभव सूर्यवंशीने 52 चेंडूत द्विशतक पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 392.31 चा होता.

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत UAE विरुद्ध भारत A संघाकडून खेळताना वैभवने सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत आपल्या फलंदाजीची ताकद दाखवली. त्यानंतरही त्याचा धावांचा वेग कमी झाला नाही. चौकार आणि षटकारांच्या जोरावर त्याने धावांचा अक्षरशः पाऊस पाडला आणि 52 चेंडूत द्विशतक पूर्ण करत इतिहास रचला आहे. त्याने अवघ्या 28 चेंडूत शतक पूर्ण केलं, त्याने 14 षटकारांच्या मदतीने शतक ठोकलं. UAE ने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 विकेट्स गमावत 249 धावा केल्या. UAE कडून हरप्रीत सिंह भाटियाने 144 चेंडूत 130 धावांची शानदार खेळी केली. भारताकडून अरशद खानने 4 विकेट्स घेत प्रभावी गोलंदाजी केली.

250 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभवच्या आक्रमक खेळीमुळे भारत A संघाने सामना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आणला. वैभवच्या या ऐतिहासिक खेळीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.15 वर्षांच्या वयात एवढा मोठा पराक्रम गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या या खेळीने क्रिकेटप्रेमींना थक्क केले असून, त्याच्या नावाची चर्चा आता क्रिकेटविश्वात जोरदार सुरू आहे.

वैभव सूर्यवंशीचा षटकारांचा विक्रम

लिस्ट-ए वनडे क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम भारताच्या वैभव सूर्यवंशी याच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याने 2026 मध्ये भारत 'ए' संघाकडून खेळताना यूएई विरुद्धच्या डावात तब्बल 28 षटकार ठोकून नवा इतिहास रचला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा डार्सी शॉर्ट असून, त्याने 2018 मध्ये सिडनी येथे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून क्वीन्सलँडविरुद्ध खेळताना एका डावात 23 षटकार मारले होते. तर, तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा बेव्हॉन जेकब्स आहे, ज्याने 2026 मध्ये ऑकलंड येथे ऑकलंडकडून खेळताना ओटॅगोविरुद्ध एकाच डावात 21 षटकार झळकावले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >