Tuesday, November 24, 2026

Asia Cup Rising Stars 2026 : UAE वर भारताचा मोठा विजय; वैभव सूर्यवंशीच्या द्विशतकी खेळीने उपांत्य फेरी निश्चित

दोहा येथे झालेल्या यूएई विरुद्ध भारत या सामन्यात भारताने आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या उपांत्य भेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. सात गडी राखत भारताने यूएईवर (India vs UAE) मात केली आहे. युएईने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 249 धावा केल्या आणि विजयासाठी 250 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना वैभव सूर्यवंशीने युएईच्या गोलंदाजांना फोडून काढलं.त्याने एकट्याने 200हून अधिक धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. वैभव सूर्यवंशीने 53 चेंडूत 7 चौकार आणि 28 षटकार मारून 204 धावांची खेळी केली आणि भारताच्या विजयात योगदान दिलं. खरं तर हा सामना त्याने एकट्याने खेळला असं म्हणायला हरकत नाही. कारण 250 पैकी 204 धावा या एकट्या वैभव सूर्यवंशीने कुटल्या. म्हणजेच भारताच्या इतर फलंदाजांच्या वाटेला फक्त 46 धावा आल्या.

बातमी अपडेट होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >