Monday, November 23, 2026

Prahaar Marathi News Live 24 November 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live Updates: राज्यातील ताज्या राजकीय हालचाली, हवामान अंदाज, मुंबई-पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि देश-विदेशातील सर्वात वेगवान लाईव्ह अपडेट्स येथे पाहा.

Prahaar Marathi News Live दिनांक 24 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या, राष्ट्रीय राजकारण, अर्थजगत, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडींचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिवसभरातील सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा एका क्लिकवर
LIVE UPDATES

Prahaar Marathi News Live Updates: मुंबईकरांनो लक्ष द्या! २६ नोव्हेंबरला २४ तास पाणीपुरवठा बंद; धारावी ते भांडुपपर्यंत अनेक भागांना फटका

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील काही भागांमध्ये २६ नोव्हेंबर रोजी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. धारावीपासून भांडुपपर्यंतच्या विविध परिसरांना या पाणी कपातीचा फटका बसणार आहे. महापालिकेकडून देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Prahaar Marathi News Live Updates: WhatsApp Web वापरणाऱ्यांसाठी सरकारचा सायबर अलर्ट! हॅकर्सकडून अकाउंट हायजॅक होण्याचा धोका

WhatsApp Web वापरणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या सायबर गुन्हे विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. २३ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या सुरक्षा सूचनेनुसार, WhatsApp Web चे सक्रिय लॉगिन हॅकर्ससाठी धोक्याचे ठरू शकते. याच्या माध्यमातून हॅकर्स खासगी चॅट वाचणे, कॉन्टॅक्ट लिस्ट पाहणे आणि संबंधित व्यक्तीच्या नावाने इतरांना मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे वापरकर्त्यांनी WhatsApp Web वापरताना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >